मुंबई - Raid 2 Release Date :अभिनेता अजय देवगणच्या आणखी एका बहुप्रतीक्षित चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. 'रेड 2'च्या निर्मात्यांनी आज, 11 सप्टेंबर रोजी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. 'रेड'च्या सीक्वलमध्ये अजय देवगण एका नव्या शत्रूबरोबर सामना करताना दिसणार आहे. 'रेड 2'ची रिलीज डेट समोर आल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाच्या स्टारकास्टचा देखील खुलासा केला आहे. ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर 'रेड 2'बद्दलची अपडेट शेअर केली आहे. तरण आदर्शच्या मते, अजय देवगण, रितेश देशमुख, वाणी कपूर स्टारर 'रेड 2'ची रिलीज डेट निश्चित करण्यात आली आहे. 'रेड 2', ज्यामध्ये अजय देवगण आयआरएस अधिकारी अमेय पटनायकची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 21 फेब्रुवारी 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
'रेड 2' चित्रपटात रितेश दिसेल वेगळ्या अंदाजात : 'रेड 2' चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार गुप्ता यांनी केलंय. या चित्रपटामध्ये रितेश देशमुखनं खलनायकाची भूमिका साकारली आहे. 'रेड 2' चित्रपटात रजत कपूर यांचीही विशेष भूमिका असणार आहे. दिल्ली आणि लखनऊमध्ये या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर शूटिंग करण्यात येत आहे. 'रेड 2' चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि कृष्ण कुमार यांनी केली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारीख समोर येताच चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, "रितेश देशमुख पुन्हा खलनायकाच्या भूमिकेत आहे." दुसऱ्याने लिहिलं, "रेड 2' हा चित्रपट सुपरहिट असणार आहे." आणखी एका चाहत्यानं यावर लिहिलं, "हा चित्रपट पाहाण्यासाठी मी उत्सुक आहे, कारण यात अजय देवगणला टक्कर रितेश देशमुख देणार आहे."