मुंबई - Aishwarya Rai : अभिनेत्री ऐश्वर्या राय पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती काल आयफा 2024 ( IIFA 2024)च्या इव्हेंटमध्ये अबुधाबीला पोहोचली. ऐश्वर्यला 'पोन्नियान सेल्वन' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा (तमिळ) पुरस्कार मिळाला आहे. या कार्यक्रमात बॉलिवूड आणि साऊथ सिनेसृष्टीतील अनेक स्टार्स उपस्थित आहेत. यावेळी ऐश्वर्या रायनं येथे मीडियाचीही भेट घेतली. यावेळी देखील ती मुलगी आराध्या बच्चनबरोबर होती. यानंतर या कार्यक्रमात मुलगी आराध्या बच्चनवर प्रश्न उपस्थित केले गेले, यानंतर ऐश्वर्या रायनं मीडियाला गप्प केलं. आता सोशल मीडियावर ऐश्वर्या रायची ही स्पष्टवक्ते शैली चांगलीच व्हायरल होत आहे.
पत्रकाराला ऐश्वर्यानं दिल उत्तर : आयफा 2024 मध्ये जेव्हा रिपोर्टरनं ऐश्वर्याला विचारलं की, "तुझी मुलगी प्रत्येक इव्हेंटमध्ये तुझ्याबरोबर असते, ती तुझ्याकडून खूप काही शिकते." तेव्हा ऐशनं रिपोर्टरला रोखलं आणि हात वर करत उत्तर दिलं, "ती माझी मुलगी आहे, नेहमीच माझ्याबरोबर असते." आता ऐश्वर्याचा ही स्टाईल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आराध्या गेल्या काही दिवसांपासून आई ऐशबरोबर प्रत्येक इव्हेंटमध्ये जात आहे. यानंतर काही लोक सोशल मीडियावर प्रश्न विचारू लागले आहे की, ती शाळेत जाते की नाही. आराध्या ही तिची शाळा कशी करत आहे, हा प्रश्न अनेकजण ऐश्वर्याच्या पोस्टवर करताना दिसते.