मुंबई - Aishwarya Rai and Aaradhya :बॉलिवूडची सौंदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या बच्चन या नेहमीच चर्चेत असतात. आता दोघीही न्यूयॉर्कमधील व्हेकेशन एन्जॉय करून मुंबईत परतल्या आहेत. 1 ऑगस्ट रोजी सकाळी ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या मुंबई विमानतळावर स्पॉट झाल्या. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि तिचा पती अभिषेक बच्चनच्या नात्यात कटुता आल्याचं म्हटलं जात आहे. ऐश्वर्या अनेक ठिकाणी आपल्या मुलीबरोबर फिरताना दिसते. याआधी या दोघीही अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात दिसल्या होत्या. या लग्नाच्या पार्टीमध्ये अभिषेक बच्चन वडील अमिताभ बच्चन, आई जया बच्चन, बहीण श्वेता बच्चन नंदा, निखिल नंदा आणि त्यांची दोन मुले नव्या आणि अगस्त्य नंदा यांच्याबरोबर आला होता.
ऐश्वर्या आणि आराध्याचा व्हिडिओ व्हायरल :अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या पार्टीपासूनचं ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये ठीक नसल्याच्या अफवा उडू लागल्या. दरम्यान सोशल मीडियावर ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोघेही विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय आणि आराध्या पापाराझीकडे पाहून हसतात. यानंतर तिथे उपस्थित असलेले लोक ऐश्वर्याला "गुड मॉर्निंग" असं म्हणतात, मग तिला, "मॅडम, कशा आहात?" विचारतात यावर ती हसत उत्तर देत म्हणते, "गुड मॉर्निंग' सगळं ठीक आहे, धन्यवाद." दरम्यान दोघींच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर , ऐश्वर्यानं एअरपोर्ट लूकसाठी ऑल ब्लॅक आउटफिट घातला होता, तर आराध्यानं लव्हेंडर स्वेटशर्ट आणि ब्लॅक ट्राउझर्स परिधान केला होता.