मुंबई - 97 व्या ऑस्कर अकादमी पुरस्कार 2025 मध्ये भारतीय चित्रपटांचा दबदबा तयार होत आहे. अलीकडेच, आमिर खानची माजी पत्नी किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' या सोशल ड्रामा चित्रपटाची निवड करण्यात आली होती. त्या पाठोपाठ आता 'सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो' हा लघुपट ऑस्कर 2025 साठी जाणर आहे. 'सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो' ने शेवटचा कान फिल्म फेस्टिव्हल २०२४ विजेता ठरला होता. आता कन्नड लघुपट ऑस्कर 2025 साठी पात्र ठरला आहे.
'लापता लेडीज'नंतर हा चित्रपटही ठरला ऑस्कर 2025 साठी पात्र, कान्समध्ये फडकवला झेंडा - KANNADA FILM ELIGIBLE FOR OSCAR
Oscar 2025 : कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये जिंकल्यानंतर 'सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो' हा चित्रपट आता ऑस्कर 2025 साठी पात्र ठरला आहे.
By ETV Bharat Entertainment Team
Published : Nov 5, 2024, 1:14 PM IST
चित्रपट कोणत्या कॅटेगिरीत निवडला गेला 'सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो' ? - 'सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो' 'लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म कॅटेगरी'मध्ये ऑस्कर २०२५ साठी पात्र ठरला आहे. 'हा चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे निर्मित आहे. ४ नोव्हेंबर रोजी एफटीआयआयने सोशल मीडियावर प्रेक्षकांना ही आनंदाची बातमी दिली आहे. FTII ने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो' ची अधिकृतपणे लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म कॅटेगिरीत 2025 ऑस्करसाठी निवड झाली आहे. 'सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो' चित्रपटाची कथा कोंबडी चोरीला गेलेल्या एका वृद्ध महिलेवर आधारित अतिशय हृदयस्पर्शी आहे. चित्रपटाच्या ऑस्करसाठीच्या निवडीमुळे एपटीआयआयच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कान्स 2024 मध्ये फडकली विजयाची पताका - यापूर्वी, 'सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो' या लघुपटाने चालू वर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये 'ला सिनेफ अवॉर्ड' जिंकला होता. बेंगळुरू इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये विजेतेपद मिळवल्यानंतर या चित्रपटाने कान्समध्ये बाजी मारली. 'सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो' चे दिग्दर्शक चिदानंद एस नायक आहेत आणि कॅमेरामन सूरज ठाकूर आहेत तर मनोज व्ही यांनी चित्रपटाच्या संकलनाचे काम केलं आहे. या चित्रपटाला अभिषेक कदम यांचे संगीत आहे.