मुंबई - Adah Sharma : 'केरळ स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्मा गेल्या वर्षभरापासून दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे घर विकत घेणार असल्यामुळे चर्चेत आहे. आता या बातम्यांवर तिनं आपलं मौन सोडलं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या रहस्यमय मृत्यूनंतर त्याचे मुंबईतील अपार्टमेंट अजूनही रिकामे आहे. या अपार्टमेंटमध्ये एकही भाडेकरू राहण्यास तयार नसल्याचं दिसत आहे. दरम्यान, जेव्हा अदा शर्मानं गेल्या वर्षी सुशांत सिंह राजपूतच्या अपार्टमेंटला भेट दिली, तेव्हा ती अपार्टमेंट खरेदी करत असल्याची चर्चा सुरू झाली होती.
अदा शर्मानं सुशांत सिंहबद्दल केला खुलासा :आता नुकत्याच एका मुलाखतीत अदानं यावर आपले मौन सोडलं आहे. या बातम्यांवर अदानं म्हटलं, ''सध्या इतकंच म्हणेन की मी प्रत्येकाच्या मनात राहते. जेव्हा मी सुशांतचे अपार्टमेंट बघायला गेले, तेव्हा मीडियाचं लक्ष माझ्याकडे गेले. तेव्हा मला आनंद झाला, पण मला माझी प्राइवेसी प्रिय आहे. मला सुशांतबद्दल आदर आहे आणि मला वाटते की अशा व्यक्तीबद्दल बोलणं चुकीचं आहे जे जगात अस्तित्वात नाही. सुशांतनं चांगले चित्रपट केले आहेत, मी त्याच्यासाठी उभी नाही, पण मी त्याचा आदर नक्कीच करते. आता देखील अदानं सुशांतच्या अपार्टमेंट घेण्याबद्दल काहीही विधान केलेले नाही.