मुंबई:अभिनेत्री अनन्या पांडे आज 30 ऑक्टोबर रोजी तिचा 26वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्तानं अनन्याच्या वडिलांनी आणि आईनं तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय सोशल मीडियावर अनन्याचे चाहते देखील तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेला वाढदिवसानिमित्त एका खास व्यक्तीनं विश केलं आहे. तिचा कथित परदेशी बॉयफ्रेंडनं अनन्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बॉयफ्रेंडनं दिलेल्या शुभेच्छावर अनन्या पांडेनं तिच्या इन्टा स्टोरीवर त्यानं विश केलेल्या पोस्टवर एक हार्ट जोडलं आहे. अनन्या पांडे ही काही दिवसांपूर्वी अभिनेता आदित्य चोप्राला डेट करत होती.
अनन्या पांडेच्या वाढदिवसानिमित्त कथित बॉयफ्रेंड दिल्या शुभेच्छा : दरम्यान अनन्या पांडेचं नाव वोल्कर ब्लँकोशी जोडले जात आहे. वोल्कर ब्लँकोनं काल रात्री त्याच्या इन्स्टा स्टोरीवर अनन्या पांडेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये वोल्करनं लिहिलं आहे की, 'हॅपी बर्थडे ब्यूटीफुल, तू खूप खास आहेस, आय लव्ह यू एनी.' वोल्कर ब्लँकोनं या पोस्टमध्ये स्माईल आणि रेड हार्ट इमोजी देखील जोडला आहेत. आता सोशल मीडियावर अनेकजण अनन्या पांडे आणि वोल्कर ब्लँको डेट करत असल्याबद्दल चर्चा करत आहेत. काहीजण तर चक्क अनन्याला तिच्या फोटोच्या पोस्टवर वोल्कर ब्लँकोबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहेत.