महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी 'हे' सेलिब्रिटी झाले रवाना - सेलिब्रिटी झाले रवाना

Ram Mandir: श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. दरम्यान हा कार्यक्रम सोहळा 22 जानेवारी रोजी होत आहे. आता अनेकजण प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी उत्सुक दिसत आहेत.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2024, 2:11 PM IST

मुंबई - Ram Mandir: श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा साजरा करण्यासाठी आता अयोध्या सज्ज झाली आहे. सुमारे 500 वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येतील ऐतिहासिक श्री राम मंदिरात श्रीरामच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणार्‍या मंदिरातील पुजेला सध्या जाताना दिसत आहे. या धार्मिक सोहळ्यासाठी अनेक कलाकारांना आमंत्रित करण्यात आलं आहे. मंदिराच्या उभारणीसाठी अनेक कलावंतांनी राम मंदिर ट्रस्टला देणगी दिली आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक दिग्गज सेलिब्रिटींच्या नावांची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती.

कंगना राणौत अयोध्येत पोहोचली : दरम्यान कंगना रणौत ही या अभिषेक सोहळ्यासाठी शनिवारी अयोध्येला पोहोचली आहे. विमानतळावरून तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती म्हणते की, ''जे अयोध्या धामला जातात, ते खूप पुण्य कमावतात. हे माझे सौभाग्य आहे की, प्रभू रामानं मला भेटायला येण्याची बुद्धी दिली आहे. काही लोक असे आहे की, ते दरबारात येत नाही.'' दरम्यान चैन्नईहून अभिनेता रजनीकांत आणि धनुषदेखील या सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले आहेत.

'हे' कलाकार झाले अयोध्याला रवाना : अभिनेता विवेक ओबेरॉय, अनुपम खेर आणि चित्रपट निर्माते मधुर भांडारकर हेही मुंबईहून अयोध्येला रवाना झाले आहेत. अनुपम खेर हे देखील दुपारी 12.30 च्या विमानानं अयोध्येला गेले आहे. ते दुपारी 2.45 वाजता थेट अयोध्येत उतरणार आहेत. अयोध्येला पोहोचण्यापूर्वी अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली. या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटलं, ''मी काश्मिरी हिंदूप्रमाणे राम मंदिराच्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे.''

हे सेलिब्रिटी असेल उपस्थित : या भव्य सोहळ्यात सहभागी होणार्‍या स्टारची यादी समोर आली आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, आयुष्मान खुराना, विकी कौशल, कतरिना कैफ, रणबीर कपूर, आलिया भट्ट, यांसारखे मोठे स्टार सज्ज झाले आहेत. दक्षिण इंडस्ट्रीतील चिरंजीवी आणि प्रभास या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

हेही वाचा :

  1. सुशांत सिंग राजपूतच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या 'या' विशेष गोष्टी
  2. सानिया मिर्झाच्या चाहत्यांकडून शोएब मलिक ट्रोल, तिसरं लग्न केल्यानं सुनावलं!
  3. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यात झालेला 'खुला' काय आहे?

ABOUT THE AUTHOR

...view details