मुंबई : अभिनेता सलमान खानचा धाकटा भाऊ-अभिनेता सोहेल खान आज 20 डिसेंबर रोजी त्याचा 54वा वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष प्रसंगी त्यानं त्याच्या चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. सोहेल खान हा बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर परतत आहे. या प्रोजेक्टद्वारे तो तेलुगू फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. दरम्यान नंदमुरी कल्याण राम स्टारर ' एनकेआर 21'चं शूटिंग सुरू झाले आहे. या चित्रपटाचं शूटिंग हे हैदराबादमध्ये होत आहे. 'एनकेआर 21' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये कल्याण रामही सहभागी झाल्याचं समजत आहे. दरम्यान, या चित्रपटात खलनायक सोहेल खान असणार आहे. आता त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याला शुभेच्छा देत त्याचा चित्रपटातील फर्स्ट लुक रिलीज केला आहे.
अभिनेता सोहेल खान करणार तेलुगूमध्ये पदार्पण : 'एनकेआर 21'मधून सोहेलचा फर्स्ट लुक रिलीज करून निर्मात्यांनी सोहेलचं तेलुगू सिनेमात स्वागत असल्याचं म्हटलं आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये निर्मात्यांनी लिहिलं, 'एनकेआर 21' खलनायक सोहेल खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तेलुगू सिनेमात तुमचे स्वागत आहे, सर. तुमचा पाठिंबा मिळाल्यानं आम्हाला खूप आनंद होत आहे.' पोस्टरमध्ये सोहेल खान काळ्या पोशाखात शांतपणे एखाद्या विषयावर विचार करताना दिसत आहे. दरम्यान सोहेल खान अखेर सलमान खानचा सुपरहिट चित्रपट 'दबंग 3' (2019) मध्ये दिसला होता. या चित्रपटात त्यानं छोटी भूमिका केली होती. याशिवाय 2021मध्ये 'राधे' चित्रपटासाठी तो निर्मात्याच्या खुर्चीवर होता.
'एनकेआर 21'बद्दल : 'एनकेआर 21' या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रदीप चिलकुरी यांनी केलं आहे. विजयशांती, श्रीकांत, पृथ्वी वीर राज, आणि सई मांजरेकर यांच्या 'एनकेआर 21'मध्ये महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार 'एनकेआर 21' चित्रपटाचे काम वेगानं सुरू आहे. हा चित्रपट ॲक्शन प्रेमींसाठी हा एक उत्तम ठरणार आहे. अशोका क्रिएशन्स आणि एनटीआर आर्ट्स संयुक्तपणे या चित्रपटाला निधी देत आहेत. आता सोहेलला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.
हेही वाचा :