महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

टायगर श्रॉफनं 'बागी 4'चं नवीन पोस्टरसह रिलीज डेटची केली घोषणा... - BAAGHI 4

टायगर श्रॉफ स्टारर 'बागी 4'चे नवीन पोस्टर आणि रिलीज डेट समोर आली आहे. या पोस्टरमध्ये टायगर हा हटके अंदाजात दिसत आहे.

tiger shroff
टायगर श्रॉफ ('बागी 4'ची घोषणा (Film Poster))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 18, 2024, 1:26 PM IST

मुंबई:बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या 'बागी 4'ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. 'बागी 4'च्या निर्मात्यांनी सोशल मीडायवर एक पोस्टर शेअर करून या चित्रपटाच्या रिलीजबद्दल खुलासा केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टरमध्ये टायगर हा थरारक आणि उग्र अवतारात दिसत आहे. 'बागी' फ्रेंचाइजीचे तीनही चित्रपट हिट ठरले आहेत. 'बागी 4'च्या पोस्टरवरून असं वाटत आहे, की यावेळी देखील या चित्रपटामध्ये टायगरची अ‍ॅक्शन चाहत्यांना पाहायला मिळेल. आता टायगरनं देखील त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर 'बागी 4'चे नवीन पोस्टर रिलीज केलंय.

टायगर श्रॉफनं शेअर केलं 'बागी 4'चं पोस्टर : पोस्टरमध्ये टायगर हातात चाकू आणि जवळच दारूची बाटली घेऊन टॉयलेट सीटवर बसलेला दिसत आहे. त्याचा चेहरा, भिंती आणि फरशी रक्तानं माखलेली आहे, टायगरचा हा लूक पाहून चाहते चकित झाले आहेत, कारण प्रेक्षकांनी टायगरला या अवतारात कधीही पाहिले नाही. टायगरनं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'एक खोल भावना, एक रक्तरंजित मिशन, यावेळी तो तसा नाही. साजिद नाडियादवालाचा 'बागी 4.' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर5 सप्टेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. आता अनेकजण या चित्रपटाच्या रिलीजसाठी उत्सुक आहेत. टायगरनं शेअर केलेल्या पोस्टरच्या कमेंट्स विभागात अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देऊन त्याला या चित्रपटासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत.

'बागी' फ्रँचायझीची सुरुवात : 'बागी' फ्रँचायझीची सुरुवात 2016 मध्ये झाली. या चित्रपटाचं दिग्दर्शन सब्बीर खान यांनी केलं होतं. एक हाय-ऑक्टेन ॲक्शन थ्रिलर, 'बागी' हा 2004 मधील तेलुगू चित्रपट वर्शम आणि 2011 मधील इंडोनेशियन चित्रपट 'द रेड: रिडेम्पशन' पासून प्रेरित आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर आणि सुधीर बाबू यांनी एकत्र काम केलं होत. यानंतर या चित्रपटाचा सीक्वेल, 'बागी 2', 2018 मध्ये आला, जो अहमद खान यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट तेलुगू चित्रपट 'क्षणम'चा रिमेक होता. त्यात टायगरबरोबर दिशा पटानी, मनोज बाजपेयी, रणदीप हुड्डा आणि इतर कलाकार दिसले होते. तिसरा चित्रपट 'बागी 3' हा 2020मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन अहमद खान यांनी केलं होतं. यात टायगर श्रॉफ, रितेश देशमुख आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होते.

वर्कफ्रंट : दरम्यान टायगरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो अलीकडेच 'सिंघम अगेन'मध्ये दिसला आहे. यामध्ये त्याच्याबरोबर अजय देवगण असून हा एक मल्टीस्टारर चित्रपट होता आहे. यात अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर, करीना कपूर यांसारखे कलाकार देखील आहेत.

हेही वाचा :

  1. 'जुग जुग जिओ 2'च्या सीक्वेलमध्ये वरुण धवनबरोबर दिसणार टायगर श्रॉफ.... - tiger shroff
  2. करण जोहरबरोबर काम करण्यासाठी टायगर श्रॉफ सज्ज, लवकरच आगामी चित्रपटाची घोषणा होणार - Tiger Shroff and KARAN JOHAR
  3. 'बडे मियाँ छोटे मियाँ'ची रिलीज डेट पुढे ढकलली ; अक्षयसह टायगरनं शेअर केला व्हिडिओ - bade miyan chote miyan release date

ABOUT THE AUTHOR

...view details