मुंबई : सोनू सूदनं कोरोना महामारीच्या काळात लाखो लोकांची मनं जिंकून केवळ भारतातच नाही तर जगभरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता त्याच्या खात्यात आणखी एका यशाची भर पडली आहे. आता सोनूला थायलंडचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषीत करण्यात आलंय. या बातमीमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये एक आनंदाची लाट पसरली आहे. थायलंडच्या पर्यटन मंत्रालयानं त्याला ऑनरेरी टूरिज्म एडवाइजरचे प्रमाणपत्र दिलंय. याबद्दलची माहिती सोनू सूदनं त्याच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केली आहे. आता त्यानं शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करून त्याच्यावर कौतुकचा वर्षाव करत आहेत.
कोरोना महामारीत लाखो लोकांची मनं जिंकली : सोनू सूदनं कोरोना महामारीत लाखो बेघर लोकांना आधार दिला होता. कोरोना काळात अनेकांना मदत केल्यानंतर तो प्रसिद्धीझोतात आला होता. त्यांच्या परोपकारी कार्यामुळे त्यानं जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळेच थायलंडच्या पर्यटन मंत्रालयानं त्यांची ऑनरेरी टूरिज्म एडवाइजर म्हणून नियुक्ती केली. दरम्यान इंस्टाग्रामवर याबद्दलची माहिती देताना सोनू सूदनं लिहिलं,'थायलंडमधील पर्यटनासाठी ब्रँड ॲम्बेसेडर आणि सल्लागार म्हणून निवड झाल्याबद्दल मला चांगलं वाटत आहे. माझी पहिली आंतरराष्ट्रीय सहल माझ्या कुटुंबासह या सुंदर देशाची होती आणि माझ्या नवीन भूमिकेत मी देशाच्या सौंदर्य आणि सांस्कृतिक वारसाचा सल्ला आणि प्रोत्साहन देण्यासाठी उत्सुक आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद.'