मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान स्टारर चित्रपट 'करण अर्जुन' अनेकांना थिएटरमध्ये पाहता आला नाही, आता त्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 'करण अर्जुन' 29 वर्ष जुना चित्रपट आता पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'करण अर्जुन'चे दिग्दर्शक आणि हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन त्यांचा कल्ट क्लासिक चित्रपट जगभरात बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. आज 28 ऑक्टोबर रोजी सलमान खाननं त्याच्या चाहत्यांना आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये ही आनंदाची बातमी दिली आहे. 'भाईजान'नं या पोस्टमध्ये लिहिलं, 'राखी जिनं चित्रपटात अगदी बरोबर सांगितलं होतं की, माझे करण अर्जुन येईल... 22 नोव्हेंबरला जगभरातील चित्रपटगृहात.'
करण-अर्जुन चित्रपट होईल रि- रिलीज :आजकाल सलमान खानची सुरक्षा अतिशय कडक करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमान तरीही चित्रपट आणि 'बिग बॉस 18'ची शूटिंग करत आहे. दरम्यान 'करण अर्जुन'च्या कहाणीबद्दल सांगणायचं झालं तर अतिशय हृदयस्पर्शी, भावनिक आणि थरारक चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खाननं अर्जुनची तर सलमान खाननं करणची भूमिका साकारली होती. याशिवाय राखीनं चित्रपटात करण-अर्जुनच्या आईची उत्तम भूमिका साकारली. 'करण अर्जुन' चित्रपटात दिवंगत अभिनेता अमरीश पुरीनं ठाकूर दुर्जन सिंग नावाच्या खलनायकाची भूमिका केली होती.