मुंबई - Shanaya Kapoor : अनिल कपूरचा धाकटा भाऊ संजय कपूरची मुलगी शनाया कपूरनं अद्याप हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले नाही. असे असले ती अनेकदा चर्चेत असते. ती सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. शनाया सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. आता अलीकडेच ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यावेळी चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिचा रॅम्प वॉक आहे. मुंबईतील एका इव्हेंटमध्ये शनाया सहभागी झाली होती. या कार्यक्रमामध्ये रॅम्प वॉक करताना अनेकांच्या नजरा शनायावर खिळल्या होत्या.
शनाया कपूरचा रॅम्प वॉक :या कार्यक्रमात शनायानं मिरर लेहेंगा परिधान केला होता. मोकळे केस आणि ग्लॉसी मेकअपमध्ये ती खूप अप्रतिम दिसत होती. आता तिचे काही सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण शनायाचे कौतुक करत आहेत. शनायानं वॉकदरम्यान आकर्षक पोझ दिल्या. यावेळी शनायाच्या चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वासही दिसला. आता तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, '' शनाया बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार आहे. तिचा लूक हा जबरदस्त आहे.'' आणखी दुसऱ्यानं लिहिलं, ''खूप हॉट दिसत आहे.'' आणखी एकानं लिहिलं, शनायाचा रॅम्प वॉक खूप सुंदर केलं आहे.'' अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत. याशिवाय काहीजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.