महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

वरुण धवन स्टारर 'बेबी जॉन'मध्ये सलमान खान करणार कॅमिओ, झाला खुलासा... - SALMAN KHAN

वरुण धवनच्या 'बेबी जॉन'मध्ये सलमान खानच्या कॅमिओची पुष्टी झाली आहे. वरुणनं याबद्दल एक हिंट दिली आहे.

baby john
बेबी जॉन (वरुण धवनच्या 'बेबी जॉन'मध्ये सलमान खानचा कॅमिओ (चित्रपट पोस्टर))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 12, 2024, 5:26 PM IST

मुंबई:वरुण धवननं अलीकडेच, एक्सवर आस्क मी एनीथिंग सत्रात त्याच्या आगामी चित्रपट 'बेबी जॉन'मध्ये सलमान खानच्या कॅमिओची पुष्टी केली आहे. कलिस दिग्दर्शित हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सलमान एका खास कॅमिओमध्ये दिसणार असल्याची चर्चा सुरू होती. पण आता याबद्दल पुष्टी झाल्यानं अनेकजण खुश झाले आहेत. वरुणनं सोशल मीडियावर आस्क मी एनीथिंग सत्रात याबद्दल हिंट दिली. आता सध्या चाहते वरुण धवनच्या आगामी चित्रपट 'बेबी जॉन'ची आतुरतेनं वाट पाहत आहेत. सत्रादरम्यान वरुणनं कॅमिओबद्दल काही मनोरंजक माहिती देखील शेअर केली आहे.

वरुण धवनच्या 'बेबी जॉन'मध्ये कॅमिओत सलमान खान दिसेल : या सत्रादरम्यान एका चाहत्यानं विचारलं, 'बेबी जॉनमध्ये 'भाईजान'चा कॅमिओ किती मिनिटांचा आहे?' यावर वरुणनं उत्तर दिले की, 'मी मिनिटबद्दल बोलणार नाही, त्याचा प्रभाव अनेक महिने राहणार आहे.' यापूर्वी, 'बेबी जॉन'च्या निर्मात्यांनी या चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज केला होता. हा टीझर खूपच धमाकेदार होता. यात वरुण हा एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असून तो एका मुलीचा सिंगल फादर असल्याचं दाखविण्यात आलं होतं. 'बेबी जॉन'च्या टीझरची सुरुवात एका मुलीने होते, ती मुलगी वरुण धवनची असते. टीझरमध्ये ती छोटी मुलगी आपल्या वडिलांबद्दल सांगते. यानंतर वरुण हा ॲक्शन करताना दिसतो. संपूर्ण टीझरमध्ये वरुण धवन ॲक्शनमोडमध्ये असल्याचा दिसत आहे.

'बेबी जॉन' चित्रपट कधी होणार रिलीज :या टीझरमध्ये साऊथ अभिनेत्री कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी यांचीही झलक दिसते. दुसरीकडे या चित्रपटात जॅकी श्रॉफ खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'बेबी जॉन' यावर्षीच्या ख्रिसमसला रुपेरी पडद्यावर दाखल होणार असल्यानं आता सलमानचे चाहते देखील खूप उत्साहित आहेत. दरम्यान अ‍ॅटली आणि जिओ स्टुडिओनं सादर केलेला हा चित्रपट ए फॉर ऍपल स्टुडिओ आणि सिने1 स्टुडिओची निर्मिती आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कलिश यांनी केलं आहे. 'बेबी जॉन' चित्रपट 85 कोटीमध्ये तयार करण्यात आला आहे.

हेही वाचा :

  1. वरुण धवन स्टारर 'बेबी जॉन'मधील जॅकी श्रॉफचा फर्स्ट लूक आला समोर, पाहा धमाकेदार पोस्टर
  2. 'बेबी जॉन'ची रिलीज डेट ठरली, वरुण धवनचा चित्रपट देणार 3 चित्रपटांशी टक्कर - Baby John release date confirmed
  3. 'बेबी जॉन' ऐवजी, 'कल्कि 2898 एडी' होऊ शकतो रिलीज, जाणून घ्या कारण... - Baby John Postponed

ABOUT THE AUTHOR

...view details