महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'चंदू चॅम्पियन' चित्रपट पाहिल्यानंतर पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांना मिळणार 50 वर्षानंतर अर्जुन पुरस्कार... - PADMASHRI MURLIKANT PETKAR

क्रीडा मंत्रालयानं अर्जुन पुरस्कारासाठी पॅरालिम्पिक दिग्गज मुरलीकांत पेटकर यांची निवड केली आहे. कार्तिक आर्यन-कबीर खाननं आता त्यांचे अभिनंदन केलं आहेत.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 3, 2025, 1:02 PM IST

मुंबई :भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांना यावर्षी अर्जुन पुरस्कार 2024नं सन्मानित करण्यात येणार आहे. 'चंदू चॅम्पियन'चं दिग्दर्शक कबीर खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांनी या यशाबद्दल आपला आनंद व्यक्त केला आहे. आता त्यांनी त्याबद्दल विजेता मुरलीकांत त्यांचे अभिनंदन केलं आहे. कबीर खान आणि कार्तिक आर्यन यांनी गुरुवारी 2 जानेवारी रोजी इंस्टाग्रामवर एक संयुक्त पोस्ट शेअर केली आहे. यात कार्तिक आर्यनच्या व्यक्तिरेखेचे ​​पोस्टर आणि मुरलीकांत यांचा फोटो आहे. दरम्यान कबीर खान आणि कार्तिक आर्यन यांनी मुरलीकांतचे अभिनंदन करणारी एक लांबलचक नोट शेअर करत लिहिलं, 'मुरलीकांत पेटकरजींचे खूप खूप अभिनंदन. आमचा चित्रपट 'चंदू चॅम्पियन'ची सुरुवात अर्जुन पुरस्कार मिळवण्यासाठी, तुमच्या लढाईच्या दृश्यानं सुरू होते. आता देशाचा सर्वात मोठा क्रीडा सन्मान मिळवताना पाहून हा प्रवास पूर्ण झाल्यासारखा वाटत आहे.'

पद्मश्री मुरलीकांत पेटकर मिळणार अर्जुन पुरस्कार:पुढं त्यांनी लिहिलं, 'तुमचा हा विजय वैयक्तिक वाटतो सर. वास्तविक चॅम्पियनचे अभिनंदन. ही भावना शब्दात व्यक्त करता येत नाही. शेवटी तुम्हाला तुमचे हक्क मिळाले, आम्हा सर्वांना तुमचा अभिमान आहे सर.' पॅरा-ॲथलीट मुरलीकांत पेटकर यांना अर्जुन जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाद्वारे मुरलीकांत पेटकर यांची कहाणी मोठ्या पडद्यावर आणणारे दिग्दर्शक कबीर खान यांनी त्यांचे अभिनंदन केलं आहे. दरम्यान एएनआयशी बोलताना कबीर खान यांनी म्हटलं, "मुरलीकांत पेटकर यांना हा सन्मान मिळाल्यानं मला खूप आनंद होत आहे. मी चित्रपटाच्या सुरुवातीलाही दाखवली होत की, त्यांना देशानं निराश केलं होत, यानंतर मी त्यांना जेव्हा भेटलो, तेव्हा त्यांची कुठलीही तक्रार केली नव्हती. तुम्ही समजू शकता की अशी एक व्यक्ती आहे, ज्याला वाटते की मला जे ओळख मिळायला पाहिजे होती. ती मला का मिळाली नाही? 50 वर्षांनंतर त्यांना ही ओळख मिळत आहे."

कबीर खानची मुलाखत : एएनआयच्या बातमीनुसार,1965मध्ये पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात मुरलीकांत पेटकर यांना नऊ गोळ्या लागल्या होत्या. या दुखापतीतून बरे झाल्यानंतरही त्यांनीृ हार न मानता पुन्हा जलतरण आणि इतर खेळांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. या खेळांमध्ये अयशस्वी होऊनही त्यांनी कधीही हार मानली नाही. नेहमीच आपले ध्येय साध्य करण्यासाठी आणि देशाला गौरव मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. 1972 मध्ये, त्यांनी भारतासाठी पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.

हेही वाचा :

  1. 'चंदू चॅम्पियन'साठी पदकास पात्र असं म्हणत, मनू भाकर केलं कार्तिक आर्यनचं कौतुक - chandu champion Movie
  2. 'चंदू चॅम्पियन'साठी अंगात ताप असताना सलग 9 तास पोहत होता कार्तिक आर्यन, केला व्हिडिओ शेअर - KARTIK AARYAN
  3. कार्तिक आर्यन स्टारर 'चंदू चॅम्पियन' 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होईल प्रदर्शित - KARTIK AARYAN

ABOUT THE AUTHOR

...view details