मुंबई :तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुन शनिवारी संध्याकाळी हैदराबादमध्ये 'पुष्पा 2'च्या चाहत्यांसाठी आयोजित आभार मेळाव्यात सहभागी झाला. या कार्यक्रमात, त्यानं 'पुष्पाराज'ला इतके प्रेम दिल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले. याशिवाय त्यानं दिग्दर्शक सुकुमार यांचेही आभार मानले. ब्लॉकबस्टर 'पुष्पा 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिस सुपरहिट ठरला आहे. अल्लू अर्जुननं कार्यक्रमात स्टेजवर 'पुष्पराज'ची सिग्नेचर स्टेपही सादर केली. या कार्यक्रमात निर्मात्यांना आणि चाहत्यांना संबोधित करताना त्यानं म्हटलं, "माझ्यासाठी 'पुष्पा' हा चित्रपट नाही, तो पाच वर्षांचा प्रवास आहे, ती एक भावना आहे. चित्रपटाचे हे प्रचंड यश मी माझ्या सर्व चाहत्यांना आणि माझ्या आर्मीला समर्पित करू इच्छितो. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. "
अल्लू अर्जुननं व्यक्त केल्या भावना :याशिवाय त्यानं पुढं म्हटलं, "पुष्पा'च्या यशामागील कारण दुसरे तिसरे कोणी नसून दिग्दर्शक सुकुमार आहेत. हे पूर्णपणे त्याचे यश आहे, ही त्याची सर्व प्रतिभा आहे. आम्हाला जिंकून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तसेच संपूर्ण तेलुगू चित्रपट उद्योगाच्या वतीनं धन्यवाद. आम्ही सर्व तुमचे आभारी आहोत. सुकुमार हे माझ्यासाठी एक, व्यक्ती नाही तर ते एक भावना आहे. मी तुमचा सर्वात मोठा चाहता आहे. तुम्ही वेगळ्या विचारसरणीचे व्यक्ती आहात. मला आनंद की आहे, की मी तुमच्या जवळचा आहे." यानंतर अल्लू अर्जुननं खुलासा केला की, 'पुष्पा 2'ला बॉक्स ऑफिसवर संघर्षापासून वाचविण्यासाठी त्यानं हिंदी चित्रपट निर्मात्यांना रिलीजची तारीख पुढे ढकलण्यास सांगितले होते. कदाचित अर्जुन विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाबद्दल बोलत होता, जो डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता.