मुंबई - अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'स्काय फोर्स' 24 जानेवारी रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सध्या अक्षय त्याच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. 'स्काय फोर्स'च्या प्रमोशन दरम्यान अक्षयला विचारण्यात आलं की, भारतीय चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरण्यामागील कारण काय आहे. यावर त्यानं म्हटलं, "ओटीटी प्लॅटफॉर्मच्या आगमनामुळे आणि त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरत आहेत." तसेच संवादादरम्यान अक्षयनं त्याच्या आगमी चित्रपटाबद्दल देखील माहिती दिली आहे.
अक्षय कुमारनं केलं विधान : अक्षयनं चित्रपटांच्या अपयशावर बोलताना पुढं म्हटलं, 'मी बऱ्याच लोकांना भेटलो आणि त्यांच्याकडून एकच गोष्ट ऐकत आहोत, आपण हे चित्रपट ओटीटीवर पाहू शकतो. बॉक्स ऑफिसवर चित्रपट फ्लॉप होण्याचे हेच सर्वात मोठं कारण आहे. कोविडनंतर लोकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहण्याची सवय लागली. आता त्याना याची सवय झाली आहे." सध्या अक्षय कुमारला 'स्काय फोर्स' चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर वीर पहाडिया दिसणार आहे. 'स्काय फोर्स' चित्रपटाद्वारे वीर हा चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.