मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि आमिर खान यांच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी मिळू शकते. शनिवारी संध्याकाळी दोन्ही स्टार्स ' तेरा यार हूं मैं ' या आगामी चित्रपटांच्या लाँचिंग इव्हेंटमध्ये पोहोचले होते. हा चित्रपट निर्माता इंद्र कुमार यांचा मुलगा अमन यांचा डेब्यू चित्रपट आहे. दरम्यानं लाँचिंग इव्हेंटमध्ये आमिर आणि अजयला एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला. याशिवाय या कार्यक्रमामध्ये पापाराझींनी देखील या दोन कलाकारांचे सुंदर फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. आमिर आणि अजयला खूप दिवसांनी एकत्र पाहून 27 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'इश्क' चित्रपटाची अनेकांना आठवण झाली. व्हायरल झालेल्या फोटोंच्या पोस्टवर अनेकजण या चित्रपटाच्या सीक्वेलची मागणी करत आहेत.
'इश्क' चित्रपटामधील आठवणी ताज्या :आमिर खान आणि अजय देवगण स्टारर 'इश्क' हा चित्रपट 1997 मध्ये रुपेरी पडद्यावर रिलीज झाला होता. या हिट रोमँटिक कॉमेडीमध्ये जूही चावला आणि काजोल यांनी देखील काम केलं होतं. हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. दरम्यान सोशल मीडियावर दोन्ही कलाकारांना एकत्र पाहताच 'इश्क 2'बद्दल प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. या दोघींनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र यावं, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. अजय आणि आमिर यांना एकत्र पाहताच पापाराझींनी 'इश्क 2'बद्दल प्रश्न विचारले. यावर या दोन्ही कलाकारांनी पुन्हा एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली.