मुंबई - Abhishek Bachchan :बॉलिवूडच्या स्टार कपलपैकी एक अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात काही ठीक नसल्याचं दिसत आहे. नुकतेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात अभिषेक आणि ऐश्वर्या एकेकटे दिसले होते. आता अभिषेक बच्चननं घटस्फोटाच्या पोस्टला लाईक करून लोकांना अधिक कंड्या पिकवायला भाग पाडलं आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिषेकनं अनंत आणि राधिकाच्या लग्नसोहळ्यानंतर असं काही केलं आहे, ज्यामुळे आता सोशल मीडियावर त्याच्या नात्याबद्दल एक नवीन अंदाज बांधला जात आहे. आता सोशल मीडियावर यांच्या घटस्फोटाबद्दल चर्चा होत असून अनेकजण ऐश्वर्याला पाठिंबा देताना दिसत आहेत.
अभिषेक बच्चननं लाईक केली घटस्फोटाशी संबंधित पोस्ट :अभिषेकनं लाईक केलेली ही पोस्ट आता खूप चर्चेत आहे. ही पोस्ट लेखिका हीना खंडेलवाल यांनी शेअर केली होती. यावर अभिषेकनं लाईक बटण दाबले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, "जेव्हा प्रेम करणे सोपे होते. ज्या जोडप्यांनी लग्न केले आहे आणि आता वेगळे होत आहेत. त्यांना हे निर्णय घेण्यास कशामुळे प्रवृत्त केले आणि ग्रे घटस्फोट का वाढत आहेत?" यानंतर त्यांनी पुढं लिहिलं, "घटस्फोट घेणं सोपं नाही, आता कोणाला सुखानं जगण्याचे स्वप्न पहायचे नाही, वृद्धापकाळात जोडीदाराचा हात धरून रस्ता ओलांडण्याची कल्पना कोण करत नाही? आयुष्य आपल्या अपेक्षेच्या विरुद्ध निघालं, पण सर्व काही ठीक दिसत असतानाही जर नातं तुटायला लागलं तर आपल्याला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं? हे अशा अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकते, 'ग्रे घटस्फोट' आणि 'सिल्व्हर स्प्लिटर' (50 वर्षांनंतर घटस्फोट घेणारे लोक) संख्या वाढत आहे."