मुंबई - KALKI 2898 AD TRAILER : बहुप्रतीक्षित 'कल्की 2898 एडी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहते आणि समीक्षकांनी अमिताभ बच्चन आणि इतर कलाकारांची प्रशंसा केली आहे. यादरम्यान बिग बींचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चननं आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे.
सोमवारी इंस्टाग्रामवर अभिषेकनं चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आणि लिहिलं, "माइंडब्लोइंग!!!!कल्की 2898 एडी."
अमिताभ, दीपिका पदुकोण आणि प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी'चा ट्रेलर सोमवारी संध्याकाळी रिलीज झाल्यापासून ट्रेंडमध्ये आहे. नाग अश्विन दिग्दर्शित हा पोस्ट-अपोकॅलिप्टिक चित्रपट हिंदू धर्मग्रंथांवर आधारित असून सन 2898 एडी मध्ये सेट केलेला आहे. ट्रेलरमध्ये असं दिसतं की, दिग्दर्शक अश्विननं भविष्यकालीन लेन्समधून महाभारताची पुनर्कल्पना केली आहे आणि त्यात डायस्टोपियन टच जोडला आहे. कमल हासन आणि दिशा पटानी देखील या चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग आहेत.
ट्रेलरच्या आधी निर्मात्यांनी दीपिका पदुकोणचं एक पोस्टर शेअर केलं. या पोस्टरवर ती खूपच इन्टेन्स दिसत आहे. 'कल्की' चित्रपटाचे निर्माते सतत नवनवीन पोस्टरसह इतर प्रमोशनल सामुग्री रिलीज करुन प्रेक्षकांची उत्कंठा सातत्यानं वाढवत आले आहेत. गेल्या महिन्यात निर्मात्यांनी कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यादरम्यान साय-फाय डायस्टोपियन चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या लुकचा टीझर शेअर केला होता.
या 21 सेकंदाच्या टीझरची सुरुवात बिग बी एका गुहेत बसून शिवलिंगाची प्रार्थना करण्यात मग्न दिसतात. एका छोट्या क्लिपमध्ये, एक लहान मुलगा बिग बींना विचारतो की, 'क्या तुम भगवान हो, क्या तुम मर नहीं सकता? तुम भगवान हो? कौन हो तुम? यावर बच्चन उत्तर देतात, "द्वापर युग से दश अवतार की प्रतीक्षा कर रहा हूँ मैं, द्रोणाचार्य का पुत्र अश्वत्थामा."