मुंबई :अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या नात्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. अर्जुन आणि मलायका यांनी बराच काळ एकमेकांना डेट केले. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन आणि मलायकाच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर येत होत्या. आता अर्जुन कपूरनं मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपच्या बातमीला दुजोरा दिला आहे. अर्जुन कपूरच्या म्हणण्यानुसार आता त्याचे आणि मलायकामध्ये कोणतेही नाते नाही. ब्रेकअपच्या बातमीची पुष्टी होण्यापूर्वी मलायका अरोरानेही एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. दरम्यान अर्जुन कपूर, राज ठाकरे यांनी काल रात्री दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते, यामध्ये रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंगम अगेन' या चित्रपटाची संपूर्ण टीम सहभागी झाली होती.
अर्जुन कपूर आहे सिंगल ? :यादरम्यान पापाराझीनं अर्जुन कपूरला विचारलं की, "मलायका अरोरा कशी आहे?" या प्रश्नावर हसत अर्जुन कपूर म्हणाला, "मी सध्या सिंगल आहे, रिलॅक्स करा." यानंतर अर्जुननं स्टेजवरून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं की, "सिंघम अगेन' हा चित्रपट तुम्हा सर्वांसाठी बनवला आहे, त्यामुळे यावेळी आमच्याबरोबर दिवाळी करा." दरम्यान अर्जुन आणि मलायका यांनी एकमेकांना पाच वर्षे डेट केले होते. 2017 मध्ये मलायकानं अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर तिनं 2019पासून अर्जुन कपूरला डेट करण्यास सुरुवात केली. दोघांनीही बराच वेळ एकत्र घालवला आणि त्यांच्या लग्नाच्या चर्चाही वारंवार होत होत्या.