महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'पुष्पा 2'च्या यशाबद्दल आमिर खानकडून अभिनंदन, 'दंगल'चा विक्रम मोडू शकेल ? - PUSHPA 2

'पुष्पा 2'च्या यशाबद्दल आमिर खाननं अभिनंदन केलं आहे. अल्लू अर्जुन स्टारर हा चित्रपट लवकरच 'बाहुबली 2'चा विक्रम मोडणार आहे.

aamir khan  and  pushpa 2
आमिर खान आणि 'पुष्पा 2' ('पुष्पा 2' (Poster/IANS))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Dec 31, 2024, 1:11 PM IST

मुंबई :अल्लू अर्जुन स्टारर चित्रपट 'पुष्पा 2' बॉक्स ऑफिसवर एक महिना पूर्ण करत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 1750 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. भारतात, 'पुष्पा 2'नं 1100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. 'पुष्पा 2' हा अल्लू अर्जुनच्या कारकिर्दीतील पहिला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट भारतीय सिनेमातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. 'पुष्पा 2'च्या यशामुळे देशात आणि जगभरात या चित्रपटावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याआधी, हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या फिल्म प्रोडक्शन हाऊस यशराज फिल्म्सनं 'पुष्पा 2'च्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले होते. आता बॉलिवूड स्टार आमिर खाननं या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.

आमिर खानची प्रॉडक्शन पोस्ट : आमिर खान प्रॉडक्शननं 'पुष्पा 2' चित्रपटाच्या यशाबद्दल पोस्ट करून लिहिलं, 'आमिर खान प्रोडक्शनच्या वतीनं 'पुष्पा 2 द रुल'च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. आम्ही चित्रपटाला पुढील यशासाठी शुभेच्छा देतो. आमच्या टीमकडून प्रेम.' 'पुष्पा 2' हा चित्रपट रोजच नवनवीन रेकॉर्ड करत आहे. हा चित्रपट आता 2000 कोटीची कमाई करण्याची वाटचाल करत आहे. 'पुष्पा 2' चित्रपट 'दंगल'चा विक्रम मोडू शकणार का? असा प्रश्न सध्या अनेकांना पडत आहे. 'दंगल' या चित्रपटाचं जगभरातील कलेक्शन 2,024 कोटी आहे. त्यामुळे 'पुष्पा 2' जर बॉक्स ऑफिसवर वेगानं कमाई करत राहिला तर, हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 2000 कोटीपेक्षा अधिक कमाई करू शकतो.

आमिर खान - पुष्पा 2 (Aamir khan Productions /Insta Story)

'पुष्पा 2' तोडणार 'बाहुबली 2' चित्रपटाचा विक्रम : आता आधी 'पुष्पा 2' हा 'बाहुबली 2' (रु. 1810 कोटी) ला मागे टाकण्याच्या मार्गावर आहे. आज 'पुष्पा 2 ' 'बाहुबली 2'चा विक्रम मोडू शकतो. 'पुष्पा 2' चित्रपटानं 26 दिवसात जगभरात 1760 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटानं हिंदी पट्ट्यामध्ये भरपूर कमाई केली आहे. 'पुष्पा 2 ' चित्रपटानं हिंदीत 770.25 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. आज रिलीजच्या 27व्या दिवशी हा चित्रपट किती कमाई करू शकतो, हे पाहणं देखील लक्षणीय असणार आहे.

हेही वाचा :

  1. वाइल्डफायर ब्लॉकबस्टर 'पुष्पा 2'नं जगभरात ओलांडला 1750 कोटींचा आकडा...
  2. 'पुष्पा 2'च्या समोर 'बेबी जॉन'ची झाली हवा, वीकेंडला किती केली कमाई जाणून घ्या...
  3. अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2'ची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई, जाणून घ्या आकडा...

ABOUT THE AUTHOR

...view details