मुंबई -Aamir Khan Praises Junaid Khan: आमिर खाननं नुकतेच राज पंडित यांच्या 'कुडिए ' या गाण्याच्या लॉन्चिंग इव्हेंटला हजेरी लावली. या कार्यक्रमात त्याने आपला मुलगा जुनैद आणि त्याच्या पहिल्या चित्रपटाबद्दल मत व्यक्त केलं. लॉन्चिंग इव्हेंटमध्ये आमिर खाननं राज पंडित यांचं 'कुडिए' गाण्यासाठी त्यांचं अभिनंदन केलं. त्यानं राज आणि त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आमिरनं मुलगा जुनैद आणि त्यांचा पहिला चित्रपट 'महाराज'चं कौतुक केलं. आमिर म्हणाला, "मला जुनैदचा खूप अभिमान वाटतो, मला सांगताना आनंद होत आहे की जुनैदनं स्वत:च्या मेहनतीनं आपला मार्ग बनवला आहे. मी तुम्हाला हे देखील सांगू इच्छितो की, त्यानं माझ्याकडून कधीही मदत घेतली नाही."
आमिर खाननं केलं आपल्या मुलाचं कौतुक : यानंतर आमिरनं पुढं म्हटलं की, जुनैदनं खूप मेहनती आहे, तो स्वत:च्या अटींवर काम करत आहे आणि पुढे जात आहे, याचा मला आनंद आहे. जुनैदचा 'महाराज' हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मी खूप नर्वस होतो की, लोकांना त्याचं काम आवडेल की नाही, यामुळे मला खूप ताण आला होता. जेव्हा एखादी व्यक्ती पहिल्यांदाच कोणतेही काम सुरू करते, तेव्हा थोडी चिंता आणि ताण येतो. जुनैदचा 'महाराज' हा चित्रपट ओटीटी प्लेटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. त्याचा हा चित्रपट अनेकांना आवडला आहे.