मुंबई - Ira Khan : अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते. अनेकदा ती स्वत:चे फोटो सोशल मीडियावर शेअर करून तिच्या चाहत्याबरोबर कनेक्डेट राहते. आता आयरानं शेअर केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. या फोटोमध्ये तिनं एकाकीपणाबद्दलची भीती व्यक्त केली आहे. या पोस्टमध्ये आयरा खाननं लिहिलं की, 'माझ्या आजूबाजूचे लोक माझ्यावर खूप प्रेम करतात पण तरीही मला एकटे राहण्याची भीती सतावत आहे. मला असहाय्य होण्याची भीती वाटते, मला जगातील प्रत्येक वाईट गोष्टीची म्हणजेच हिंसा, रोग, क्रूरतेबाबत भीती वाटते.
आयरा खाननं केली भीती व्यक्ती :याशिवाय आयरानं पुढं सांगितलं, 'मला माझ्या आईला गमावण्याची भीती वाटते. माझ्या भीतीवर काहीही उपाय नाही. यानंतर मी एखादे गाणे किंवा चित्रपट पाहते. मला जेव्हा कोणी असं सांगतं की, सर्व काही ठीक आहे, त्यानंतर मला चांगलं वाटतं. लग्नाच्या 4 महिन्यांनंतर आयरानं अशी पोस्ट शेअर करून चाहत्यांची चिंता वाढवली आहे. आता तिला अनेकजण विचारत आहे की, जर ती विवाहित आहे तर तिला एकटं का वाटत आहे. याआधी देखील आयरानं एका मुलाखतीत सांगितलं होत की, काही वर्षापूर्वी ती डिप्रेशनमध्ये होती. अनेकदा ती सोशल मीडियावर तिच्या भावना प्रकट करत असते. मात्र लग्नानंतर तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकजण तिच्याविषयी चिंता व्यक्त करताना दिसत आहेत.