मुंबई - साऊथ अभिनेता अल्लू अर्जुन गेल्या काही दिवसांपासून संध्या थिएटरबाहेर चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेच्या मृत्यूच्या प्रकरणामुळे चर्चेत आहे. दरम्यान अल्लू अर्जुन पत्नी स्नेहा रेड्डी आणि मुलांसह चिरंजीवी यांना त्यांच्या घरी भेटायला गेला. यावेळी त्याच्याबरोबर त्याचे वडील, निर्माता अल्लू अरविंद देखील होते. आता त्याचे सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. एका फोटोमध्ये अल्लू अर्जुन आपल्या पत्नीसह आणि चिरंजीवी यांच्याबरोबर पोझ देताना दिसत आहे. आता या फोटोवर अनेक चाहते कमेंट्स करून पुष्पराजला पाठिंबा देत आहेत. तसेच मिळालेल्या माहितीनुसार चिरंजीवीनं आपल्या पुतण्या अल्लू अर्जुनला जेवणासाठी घरी बोलावलं असल्याचं दिसत आहे.
अल्लू अर्जुन घेतली चिरंजीवी भेट :तसेच अल्लू अर्जुनचा कुटुंबाबरोबर जात असताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तो कार चालवताना दिसत आहे. यावेळी अल्लू अर्जुनला कॅमेऱ्यात पापाराझींनी कैद केलं. अल्लूच्या कारमध्ये त्याची पत्नी स्नेहा रेड्डी आणि त्याची मुलं बसल्याची दिसली. याशिवाय दुसऱ्या एका कारमध्ये अल्लूचे वडील, अल्लू अरविंद दिसले. आता फक्त चिरंजीवी हे अल्लू अर्जुन भेटले की, याबरोबर वरुण तेज, साई धरम तेज आणि राम चरण हे देखील त्याला भेटले असेल हे लवकरच समजून येईल. गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुन कठीण काळातून जात आहे.