मुंबई - OTT ATTRACTIONS OF JUNE : जून महिन्यामध्ये ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका होण्याचे संकेत मिळत आहेत. नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईम व्हिडिओसह इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर साधराण 15 नवे जुने चित्रपट आणि वेब मालिका प्रसारित होणार आहेत. आम्ही तुमच्यासाठी जून महिन्यात वेगवेगळ्या ओटीटीवर प्रसारित होणाऱ्या या मनोरंजक चित्रपट मालिकांची यादी तयार केली आहे. यामध्ये 'मैदान', 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि साऊथचा हिट चित्रपट 'द गोट लाइफ' या तीन मोठ्या बॉलिवूड चित्रपटांचाही समावेश आहे. याशिवाय अनेक नवीन वेब सीरिजचाही समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये काही विदेशी मालिकाही प्रदर्शित होणार आहेत.
नवीन मालिका
- मिर्झापूर सीझन 3
- पिगी बँक सीझन 4
- द लिजेंड ऑफ हनुमान सीझन 4
- गुन्हा
-
- महाराज (चित्रपट)
अलीकडील रिलीज चित्रपट
- मैदान
- बडे़ मियां छोटे मियां
- द गोट लाइफ (साउथ)
परदेशी मालिका
- ब्रिजर्टन सीजन 3 पार्ट 2
- द बॉयज सीजन 4
- हाउस ऑफ द ड्रैगन सीजन 2
याशिवाय, जूनमध्ये विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या सर्व मालिका-चित्रपटांची यादी आहे. जून महिन्यात तुम्ही घर, ऑफिस, पार्क इत्यादी आरामदायी ठिकाणी या चित्रपटांचा आणि मालिकांचा आनंद घेऊ शकता.
चित्रपटगृहातही तुमच्यासाठी जून महिन्यात भरपूर मनोरंजन असणार आहे. वेगवेगळ्या जॉनरचे काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. यामध्ये चंदू चॅम्पियन आणि बहुप्रतीक्षित कल्कि २८९८ हे दोन मोठे चित्रपट आहेत. जून महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांवर एक नजर टाका.
- मुंज्या (हॉरर कॉमेडी) 7 जून
- फूली (ड्रामा) 7 जून
- हमारे 12 (ड्रामा) 7 जून
- चंदू चॅम्पियन (स्पोर्ट्स बायोग्राफी) 14 जून
- महाराज (क्राइम बायोग्राफी) 14 जून
- इश्क विश्क रिबाउंड (रोमँटिक कॉमेडी) २१ जून
- कल्कि २८९८ (२७ जून)
- कुकी (सोशल ड्रामा) 28 जून
- ब्लॅकआउट (कॉमेडी थ्रिलर) 28 जून (जिओ सिनेमा)
हेही वाचा -
- बिग बॉस ओटीटी 3 शोमध्ये अनिल कपूरची होस्ट बनून झकास एन्ट्री - Anil Kapoor
- जून महिन्यात रिलीज होणार 'कल्की 2898AD' ते 'चंदू चॅम्पियन' पर्यंत हे 10 चित्रपट - Movies releasing in June
- लवकरच प्रदर्शित होणारे 10 कॉमेडी चित्रपट तुम्हाला करतील टेन्शन फ्री, पाहा रिलीज तारखा - Top ten Coming Soon Comedy Movie