महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'सरफरोश'ची 25 वर्षे : नवाजुद्दीन सिद्दीकीनं शेअर केला आमिर खानबरोबर काम करण्याचा अनुभव - 25 years of Sarfarosh - 25 YEARS OF SARFAROSH

'सरफरोश' या चित्रपटाला नुकतीच 25 वर्षे पूर्ण झाली. यामध्ये नवाजुद्दीननं व्हिक्टोरिया हाऊसवर छापा मारल्यानंतर पकडण्यात आलेल्या एका अपराध्याची भूमिका साकारली होती. ही भूमिका छोटी असली तरी ती संस्मरणीय ठरली. या चित्रपटाची आठवण सांगताना नवाजने आमिर खानबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.

Nawazuddin Siddiqui and Aamir Khan
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आमिर खान (Image source X)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 11:52 AM IST

मुंबई - अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने आठवणींच्या जगतात एक फेरफटका मारला आणि सुपरस्टार आमिर खानबरोबर 'सरफरोश' आणि 'तलाश' सारख्या चित्रपटांमध्ये काम करण्याचा त्याचा अनुभव शेअर केला आहे.

तो म्हणाला की आमिर खानसोबत सेटवर आणि बाहेर काम करणे हा एक समृद्ध अनुभव होता. "'सरफरोश' आणि 'तलाश' या दोन्ही चित्रपटांमध्ये आमिरबरोबर स्क्रीन शेअर करणे हा एक रोमांचकारी प्रवास होता. सेटच्या बाहेरही आमचा बंध तितकाच मजबूत, परस्पर आदराने भरलेला आणि अव्यक्त समजूतदार असाच होता. आमिरचं समर्पण आणि त्याची कलेबद्दलची आवड खरोखरच प्रेरणादायी आहे आणि आमचे चर्चा बऱ्याचदा स्क्रिप्ट्स आणि सीन्सच्या पलीकडे जात असत, आम्हाला सिनेमावर चर्चा करायला आवडायचे,” असं नवाजुद्दीनने आमिरबरोबरचा अनभव कथन करताना म्हटलं.

नसिरुद्दीन शाहा, नवाजुद्दीन आणि आमिर स्टारर ''सरफरोश' ' या चित्रपटाला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं आमिर आणि 'सरफरोश' च्या निर्मात्यांनी नुकतेच चित्रपटाचे एक विशेष स्क्रीनिंग आयोजित केलं होतं. यासाठी चित्रपटाची संपूर्ण टीम इतक्या वर्षांनंतर एकत्र आली होती. मुंबईतील पीव्हीआर जुहू येथे 'सरफरोश' चे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं होतं.

यावेळी मीडियाशी संवाद साधताना, आमिरने शेअर केले की तो त्याच्या क्लासिक चित्रपट 'सरफरोश' चा सिक्वेल बनवण्याचा खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहे आणि टीम आता या फॉलोअप घेण्याच्या दृष्टीने गंभीरपणे विचार करत आहे.

आमिर म्हणाला, "'सरफरोश' 2 हा चित्रपट बनला पाहिजे, असं मला वाटतं. आम्ही चित्रपट पूर्ण केला तेव्हा आमच्या मनात एक विचार होता की आपण याचा पार्ट 2 बनवू शकतो. आताही मी जॉनला (दिग्दर्शक जॉन मॅथ्यू माथन) 'सरफरोश' 2 बनवू शकेल अशी एक चांगली कथा लिहिण्यासाठी सांगतोय. आणि यावेळी तो म्हणाला की तो नक्की काम करेल."

जॉन मॅथ्यू माथन दिग्दर्शित 'सरफरोश' हा चित्रपट आमिरच्या पोलीस पात्राभोवती फिरतो. त्याच्या वडिलांना अर्धांगवायू झाल्यानंतर आणि त्याच्या मोठ्या भावाची दहशतवाद्यांनी हत्या केल्यानंतर गुन्हेगारी नष्ट करण्याची तो शपथ घेतो. कथानकाशिवाय, ''सरफरोश' 'ची दुसरी सर्वात खास बाजू म्हणजे त्याचे संगीत. जतिन-ललित यांनी संगीतबद्ध केलेल्या या चित्रपटात जगजीत सिंगची 'होश वाले को खबर क्या', 'जिंदगी मौत ना बन जाए', 'इस दिवाने लडके को,' 'जो हाल दिल का' इत्यादी कालातीत गाणी आहेत.

हेही वाचा -

  1. लोकआग्रहास्तव सचिवची फुलेरा वापसी : 'पंचायत सीझन 3' च्या ट्रेलरने इंटरनेटवर वादळ - Panchayat Season 3
  2. कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये उर्वशी रौतेलाचा जलवा, दीपिका पदुकोणच्या लूकची करुन दिली आठवण - urvashi rautela
  3. करण जोहरच्या 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही'मधील पहिलं गाणं प्रदर्शित - Mr and Mrs Mahi First Song Released

ABOUT THE AUTHOR

...view details