महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'12वी फेल'चा अभिनेता होणार 'डॉन 3'चा व्हिलन, खलनायक बनून रणवीर सिंगला टक्कर देणार! - FARAHAN AKHTAR DON 3

रणवीर सिंग अभिनित 'डॉन 3' मध्ये त्याला टक्कर देण्यासाठी एका नव्या व्हिलनची निवड झाली आहे. हा अभिनेता कोण हे जाणून घेण्यासाठी वाचा.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 15, 2024, 1:18 PM IST

मुंबई - निर्माता दिग्दर्शनक फराहन अख्तर आगामी 'डॉन 3' चित्रपटाची तयारी करत आहे. 'डॉन' हा भारतीय प्रेक्षकांच्या पंसतीस पडलेला लोकप्रिय चित्रपट आहे. मूळ 'डॉन' चित्रपटात अमिताभ बच्चननं मुख्य भूमिका साकारील होती. यातील सर्व कलाकारांचा अभिनय, डायलॉग, अ‍ॅक्शन आणि गाणी याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. या चित्रपटाच्या रिमेकमध्ये शाहरुख खाननं भूमिका केली होती. शाहरुखच्या डॉन चित्रपटाचा नंतर सीक्वेलही आला. आता याच्या तिसऱ्या भागात रणवीर सिंग डॉनची भूमिका साकारणार आहे. सध्या हा बहुप्रतीक्षित अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला असल्याचं समजत आहे. या चित्रपटाच्या स्टार कास्टमध्ये '12वी फेल'चा अभिनेता विक्रांत मॅस्सी याचा समावेश करण्यात आला आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी निर्मिती 'डॉन 3'मध्ये विक्रांत मॅसीची भूमिका काय असेल याचाही खुलासा झाला आहे. ही बातमी बी-टाऊन आणि सोशल मीडियात वाऱ्यासारखी पसरली आहे. विक्रांत मॅसीचा 'द साबरमती रिपोर्ट्स' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात विक्रांतबरोबर रिद्धी डोगरा आणि राशि खन्ना महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

'डॉन 3' मध्ये विक्रांत मॅसीची भूमिका काय आहे? - मिळालेल्या माहितीनुसार विक्रांत मॅसी 'डॉन 3' मध्ये दाखल झाला आहे. 'डॉन ३' चित्रपटात तो खलनायकाची भूमिका साकारू शकतो. विक्रांत रणवीर सिंगच्या विरुद्ध खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, याला निर्मात्यांनी दुजोरा दिलेला नाही किंवा विक्रांतनं चित्रपट साइन करण्याबाबत काहीही सांगितलेलं नाही.

अमिताभ बच्चन आणि शाहरुख खाननंतर आता रणवीर सिंग डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. 'डॉन 3' मध्ये शाहरुख खानची जागा रणवीर सिंगने घेतली आहे. त्याचबरोबर रणवीर सिंग डॉन 3 मधील घोषणेनंतर ट्रोल होत आहे. शाहरुखच्या चाहत्यांना रणवीर सिंग कुठेही 'डॉन'च्या भूमिकेसाठी परफेक्ट वाटत नाही. डॉनच्या भूमिकेत रणवीर सिंग कुठेही बसत नसल्याचे शाहरुख खानच्या चाहत्यांनी म्हटलंय. त्याचवेळी 'डॉन'च्या भूमिकेसाठी ट्रोल झाल्यानंतर रणवीर सिंगने लोकांना संधी देण्याचे आवाहन केले होते.

रणवीर सिंग गेल्या वर्षी आलिया भट्टबरोबर 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' या चित्रपटात दिसला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सरासरी राहिला. सध्या रणवीर सिंग 'सिंघम अगेन' चित्रपटात त्याच्या सिम्बा लूकमध्ये कॅमिओ करताना दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details