मुंबई : लॉस एंजेलिसमधील जंगलातील आगीची तीव्रता 97व्या ऑस्कर पुरस्कारांपर्यंत पोहोचली आहे. अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसनं पुन्हा एकदा ऑस्कर नामांकनांची घोषणा पुढे ढकलली आहे. 97वा ऑस्कर पुरस्कार 2 मार्च रोजी होणार आहे. दरम्यान सोमवारी अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसनं एक निवेदन जारी केलं होतं. यात त्यांनी ऑस्कर नामांकन पुढं ढकलण्याबद्दल आणि नवीन तारखेची घोषणा केली आहे. अकादमीचे सीईओ बिल क्रॅमर आणि अकादमीच्या अध्यक्षा जेनेट यांग यांनी निवेदनात म्हटलं आहे की, 'आगीच्या परिणामामुळे आमच्या समुदायातील इतक्या लोकांना झालेल्या गंभीर नुकसानामुळे, आम्ही सर्वजण स्तब्ध झालो आहोत. चित्रपट उद्योगात एकता आणि शक्ती निर्माण झाली आहे. आम्ही अडचणींना तोंड देत एकत्र उभे राहण्यास वचनबद्ध आहोत.'
कधी होणार नॉमिनेशनची घोषणा : सोमवारीच, राइटर्स गिल्ड ऑफ अमेरिकानं नामांकनाची घोषणा पुढं ढकलल्याची माहिती दिली. सुरुवातीला 9 जानेवारी रोजी नियोजित नामांकन प्रक्रिया सोमवारपर्यंत पुढं ढकलण्यात आलं होत. यानंतर दुसऱ्यांदा नामांकन प्रक्रिया पुढं ढकलण्यात आली आहे. ऑस्कर नामांकनांसाठी मतदानाची तारीख 17 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाढविण्यात आली होती. दुसऱ्यांदा नामांकनांच्या घोषणेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता 23 जानेवारी 2025 रोजी सकाळी 5.30 वाजता पीटी येथे व्हर्च्युअल पद्धतीनं नॉमिनेशन अनाउंसमेंट केले जाईल.
97व्या ऑस्कर पुरस्कारचा कार्यक्रम कधी होणार : दरम्यान अकादमीनं वार्षिक नामांकन भोजन कार्यक्रम देखील रद्द केला आहे. 97 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा 2 मार्च रोजी डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे. इथे थेट प्रक्षेपण एबीसीवर संध्याकाळी 7 वाजता ईटीवरून होईल. याशिवाय याचे थेट प्रक्षेपण हुलूवर देखील होणार आहे. .लॉस एंजेलिसमधील जंगलातील आगीमुळे हे कठीण निर्णय आता घेतले जात आहे.
Presenting the 97th #Oscars shortlists in 10 award categories: https://t.co/Ite500TEEC
— The Academy (@TheAcademy) December 17, 2024
Find out who will be nominated on January 17th, and tune into @ABCNetwork and @Hulu to watch the Oscars LIVE on Sunday, March 2nd at 7e/4p. pic.twitter.com/lzc9xViWC7
कॅलिफोर्नियातील आग : या विनाशकारी आगनं कॅलिफोर्नियातील सेंट मोनिका आणि मालिबू दरम्यानच्या पॅसिफिक पॅलिसेड्सच्या 1200 एकरपेक्षा जास्त क्षेत्राला वेढले होते. व्हेंचुरा काउंटीमधील आगीनं 50 एकर क्षेत्र व्यापले होते. ही आग विझविण्यासाठी जवळपास 60हून अधिक अग्निशमन दलाच्या कंपन्या पाठवण्यात आल्या आहेत. तसेच जंगलातील आगीचे कारण अद्याप कळलेले नाही. मात्र 4 दिवसांपासून सुरू असलेली आगेमुळे खूप नुकसान झालं आहे.
हेही वाचा :