वॉशिंग्टन-अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशननं (Securities and Exchange Commission) अदानी समूहाचे संस्थापक आणि अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप केला. धक्कादायक बाब म्हणजे सौर उर्जा प्रकल्पासंदर्भात अदानींनी भारतीय अधिकाऱ्यांना 250 दशलक्ष डॉलरची लाच दिल्याचंही अमेरिकेच्या सरकारी संस्थांनी आरोपात म्हटलं आहे.
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशननं (SEC) आरोपात काय म्हटलं? एसईसी ही भारतीय सेबीप्रमाणं गुंतवणुकदारांचे हितरक्षण करणारी अमेरिकेची सरकारी संस्था आहे. या संस्थेनं अदानी ग्रुपवर गंभीर आरोप केले.अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी (६२), त्यांचा पुतण्या सागर अदानी (३०), अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे अधिकारी आणि अझूर पॉवर ग्लोबल लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह सिरिल कॅबनेस यांच्यावर सिक्युरिटीजची फसवणूक आणि कट रचण्याचा आरोप ठेवण्यात आला. अमेरिकन गुंतवणूकदार आणि जागतिक वित्तीय यांच्याकडून निधी मिळविण्यासाठी अदानींकडून खोटी आणि चुकीची माहिती दिल्याचं आरोपामध्ये म्हटले आहे. भारत सरकारनं अदानींच्या कंपन्यांना अब्जावधी डॉलरचे प्रोजक्ट दिले आहेत. या कंपन्यांना भांडवल मिळविण्यासाठी लाचखोरीची योजना आखण्यात आली होती, असा एसईसीनं दावा केला.
एसईच्या आरोपातील महत्त्वाची मुद्दे
- कथित योजेनंतर्गत अदानी ग्रीन कंपनीनं गुंतवणूकदारांकडून 175 दशलक्ष डॉलरहून अधिक पैसे गोळा केले. अझूरे पॉवर शेअरची न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये खरेदी-विक्री झाली.
- ब्रुकलिनमधील फेडरल कोर्टात फेडरल आरोपपत्रात इतर पाच जणांवर लाचखोरी योजनेच्या संदर्भात कायद्याचे उल्लंघन करताना कट रचल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा जगातील सर्वात मोठ्या सौर उर्जा प्रकल्पाशी संबंध आहे.
- फेडरल वकिलांच्या दाव्यानुसार 2020 आणि 2024 दरम्यान, अदानी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 2 अब्ज डॉलर पेक्षा जास्त किमतीचे सौर ऊर्जा करार मिळविण्यासाठी 250 दशलक्ष डॉलरची लाच देण्याचे नियोजन केले होते.
- फेडरल सिक्युरिटीज कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याचा अदानींवर आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कायमस्वरूपी बंदी, अधिकारी आणि संचालकांवर कारवाईची एसईसीनं शिफासस केली आहे.