हैदराबाद :टेलिकॉम कंपनी व्होडाफोन ग्रुप पीएलसीनं युरोप आणि आफ्रिकेतील ग्राहकांसाठी क्लाउड सेवा, जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) टूल्स आणि सायबर सुरक्षा आणण्यासाठी अल्फाबेटच्या Google सोबत भागीदारी केली आहे.
“व्होडाफोन आणि गुगल एकत्रितपणे नवीन AI वर चालणारी उपकरणे आणखी लाखो ग्राहकांच्या हातात देतील. या सेवांचा वापर करून, आमचे ग्राहक शिकण, संवाद साधण्याचे नवीन मार्ग शोधू शकतात. - मार्गेरिटा डेला व्हॅले, मुख्य कार्यकारी व्होडाफोन
व्होडाफोनची Google सोबत भागिदारी : विद्यमान भागीदारीच्या 10 वर्षांच्या विस्तारामध्ये, व्होडाफोन Google च्या क्लाउड स्टोरेज सदस्यतांना चालना देणार आहे. ज्यामध्ये Google One AI प्रीमियम समाविष्ट आहे. यातून जेमिनी चॅटबॉटमध्ये सहज प्रवेश करता येतो, असं Vodafone नं मंगळवारी एका निवेदनात म्हटलं आहे. UK-आधारित ऑपरेटर ग्राहकांना स्टोअरमध्ये नवीनतम Pixel डिव्हाइसेसची AI वैशिष्ट्ये कशी वापरायची हे देखील सांगणार आहे.
"डिव्हाइसेसचं स्वरूप आणि डिव्हाइसेसवरील लोकांच्या अनुभवांचे स्वरूप बदलणार आहे. कारण डिव्हाइसेसवर AI अधिक प्रभावी काम करणार आहे."Google आणि Vodafone यासाठी काम करत आहेत."- थॉमस कुरियन, मुख्य कार्यकारी अधिकारी Google क्लाउड
Google च्या क्लाउड तंत्रज्ञानाचा वापर : कंपनीन व्यतिरिक्त डिजिटल सेवा देऊन त्यांच्या कमाईच्या स्त्रोतांमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करत आहेत. व्होडाफोन टीव्ही बॉक्स सेवेसाठी सर्च, शिफारसी आणि जाहिरात सुधारण्यासाठी आणि व्यावसायिक वापरकर्त्यांसाठी नवीन क्लाउड सायबर सुरक्षा उत्पादन विकसित करण्यासाठी Google च्या तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचं त्यानी निवेदनात म्हटलं आहे. ग्राहकांना जनरेटिव्ह AI आणि सायबर सुरक्षा प्रदान करण्यासाठी व्होडाफोनचं हे महत्वाचं पाऊल असल्याचं मानलं जात आहे. यामुळं ग्राहकांची डेटा सुरक्षा सुनिश्चित होणार आहे.
हे वाचलंत का :
- AI च्या गॉडफादरसह अमेरिकन शास्त्रज्ञाला भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक
- टोयोटा किर्लोस्कर मोटरला संभाजीनगरमध्ये 827 एकर जमीन मंजूर, 26 हजार रोजगार निर्मिती
- व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर