मुंबई RBI foundation day 2024 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 90 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आज (1 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हजेरी लावली होती. यावेळी राज्यपाल रमेश बैस, अर्थमंत्री निर्मला सीतारमन, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी? : यावेळी बोलत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आरबीआयचे लक्ष्य आणि संकल्पासाठी शुभेच्छा आहे. आरबीआयची तत्वामुळे जगभरात ओळख आहे. एकेकाळी बुडणारी बँक व्यवस्था नफ्यात आली आहे. गेल्या १० वर्षांत बँकिंग व्यवस्था नफ्यात आली आहे. गेल्या १० वर्षात मोठे बदल झाले आहेत. देशाची आर्थिक प्रगती वेगाने सुरू आहे. आमची नीतीमत्ता चांगली असल्यानं परिणामही चांगले येतात. गेल्या १० वर्षांमध्ये आम्ही बँकिंग क्षेत्रात मोठे बदल केले आहेत.
देशात महागाई मध्यम स्तरावर :पंतप्रधान मोदी म्हणाले, "मागच्या दहा वर्षात जे झालं तो फक्त ट्रेलर होता. अजून आपल्याला या क्षेत्रात बरच काही करायचं आहे. भारताची प्रगती सर्वात जास्त गतीने व्हावी, यासाठी आरबीआयला महत्त्वाची पाऊल उचलावी लागणार आहेत. आरबीआयनं सुद्धा विविध क्षेत्रातील आढावा घेऊन त्या पद्धतीने बँकिंग क्षेत्राला प्रोत्साहन दिल पाहिजे. मी सांगू इच्छितो की सरकार आपल्यासोबत आहे. आम्ही कोरोनामध्येही आर्थिक व्यवस्थेवर सुद्धा लक्ष दिले. सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा लक्ष दिलं. मोठे देश अजून त्यातून सावरले नाहीत. मात्र भारतीय अर्थव्यवस्था नवा विक्रम बनवत आहे. देशात महागाई मध्यम स्तरावर आहे. किसान क्रेडिट कार्डचा शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे."
आरबीआयने नवीन योजनांचा विचार करावा :कोरोनामध्ये आम्ही एमएसईबी सेक्टरसाठी काम केले. त्यासाठी एमएसई क्षेत्राला मोठी तागद मिळावी. सौर उर्जा क्षेत्राला सरकार मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळाले. सरकारच्या धोरणांमुळे देशात अनेक नवीन क्षेत्र उदयाला आली आहेत. आता निवडणुका आहेत. शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून कामं येणार आहेत. म्हणून तुम्ही सर्वांनी तयारीत राहा, आता तुमच्याकडे वेळ आहे. आता १०० दिवस मी निवडणुकांमध्ये व्यस्त आहे. १०० दिवसांमध्ये आरबीआयने नवीन योजनांचा विचार करावा, असा सल्ला देखील यावेळी पंतप्रधान मोदींनी दिला.
मार्गावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात :लोकसभा निवडणुकीमुळं राजकीय पक्षांकडून देशात जोरात प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्रात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं मुंबईत कडेकोट सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) १ एप्रिल २०२४ रोजी ९० व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए), नरिमन पॉईट, मुंबई या ठिकाणी एका कार्यक्रम आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येणार असल्यामुळं मुंबईत मागील दोन दिवसांपासून सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आली आहे. नरिमन पॉईट भागात रस्ते स्वच्छ व सुंदर करण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदींचा ताफा जाणाऱ्या मार्गावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.