हैदराबादLPG Price:आज अंतरिम बजेट सादर झालं. त्याआधीच एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत. अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी सिलेंडरच्या दरात वाढ करून तेल कंपन्यांनी दणका दिला आहे. दिल्ली, मुंबई, लखनौ, जयपूरसह संपूर्ण देशात एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत तुमच्या शहरात सिलेंडर किती महाग झाला आणि किती किंमतीला विकला जातो हे जाणून घ्या.
19KG कॉमर्शियल सिलिंडरच्या किमती वाढल्या :ही दर वाढ 19KG व्यावसायिक सिलेंडरवर झाली आहे पण घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही, ही मोठी दिलासादायक बाब आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नव्या किमती आजपासून लागू झाल्याची माहिती आहे. तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमती अपडेट करतात. 1 जानेवारीलाही 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली होती, मात्र आज ही दरवाढ करण्यात आली आहे.
कॉमर्शियल गॅस सिलेंडर महागला : तेल कंपन्यांनी 1 फेब्रुवारी रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडर दर वाढवले. 19 किलोच्या सिलेंडरच्या दरात 14 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या 14 किलोच्या सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.