कोलकाता: सोन्यानं गेल्या तीन वर्षांत 13 टक्क्यांचा सीएजीआर (CAGR) दिला आहे. सीएजीआर म्हणजे कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट हा एखाद्या कालावधीत गुंतवणुकीची झालेली वाढ निश्चित करण्यासाठी मोजला जातो. भारतीयांना इतिहासकाळापासून सोन्याच्या दागिन्यांबद्दल प्रेम आहे, ETFs आणि SGBs असल्यानं एखाद्याला लॉकर ठेवण्याचा अतिरिक्त खर्च न करता आणि सोन्याच्या दागिन्यांच्या सुरक्षेबद्दल तणाव न होता सोने ठेवण्यास मदत होते.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटजीचे प्रमुख चिंतन हरिया म्हणाले, "अक्षय तृतीयेसारख्या शुभ मुहर्तावर सोने खरेदी करणं ही भारताच्या अत्यंत जुन्या परंपरापैकी एक परंपरा आहे. गेल्या तीन वर्षांपासून सोन्यातून १३ टक्के एवढा चांगल्या पद्धतीचा सीएजीआर मिळत आहे. भविष्यातही अशीच सकारात्मक स्थिती राहणार आहे. सोन्याचे दर वाढण्याची विविध आहेत. यामध्ये अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर कपातीपाबाबत निर्णय घेण्यास उशीर होण्याची शक्यता, भू-राजकीय वाढणारे तणाव, देशांतर्गत शेअरचे होणारे महागडे मूल्यांकन आणि लोकसभा निवडणू अशी कारणे आहेत. प्रचंड वाढणारी महागाई आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात असलेली आर्थिक अनिश्चितता, अशी स्थिती असताना सोने हे भांडवल गुंतवणुकीकरिता चांगला पर्याय ठरू शकते. सोन्यातील गुंतवणुकीकरिता प्रत्येकापुढे विविध पर्याय आहेत. त्यापैकी सुवर्ण ईटीएफ ( Gold ETF) हा सोपा पर्याय आहे. भौतिक सोने ताब्यात न घेता किंवा जवळ न बाळगता सुवर्ण ईटीएफ हा सोपा आणि कमी खर्चातील गुंतवणुकीचा पर्याय आहे." गोल्ड ईटीएफची तरलक्षमता ( Liquidity) हा चिंतेचा विषय नाही. कारण, गोल्ड ईटीएफची शेअर बाजाराच्या ट्रेडिंगप्रमाणं विक्री करता येत असल्याचं हरिया यांनी सांगितलं.
काय आहे गोल्ड ईटीएफ?गोल्ड ईटीएफ म्हणजे गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETFs) हे गुंतवणुकीचं साधे उत्पादन आहे. त्यामध्ये शेअरमधील लवचिक गुंतवणूक आणि सोन्यातील गुंतवणुकीचा साधेपणा असतो. बाजारातील किमतीप्रमाणं कंपनीच्या शेअरची खरेदी करण्याप्रमाणं ईडीएफची खरेदी आणि विक्री ही नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज करता येते. गोल्ड ईटीएफची गुंतवणूक ही सोन्याच्या किमतीवर आधारित असते. तर गुंतवणूक ही सोन्याच्या दरवाढीवर निश्चित होते. थेट सोन्याच्या किमतीवर गोल्ड ईटीएफ असल्यानं त्यात संपूर्णपणं पादर्शकता असते. आणखी सांगायचं झाले तर गोल्ड ईटीएफच्या अद्वितीय रचना आणि संरचनेमुळे ईटीएफ ही भौतिक सोन्यातील गुंतवणुकीच्या तुलनेत कमी खर्चातील गुंतवणूक असते. गोल्ड ईटीएफची असेट अंडर मॅनेजमेंट (AUM) ही तीन वर्षांमध्ये दुप्पट होऊन 33 हजार कोटी झाली आहे.