महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून : प्रेमाला नकार दिल्यानं नराधमानं घरात घुसून तरुणीला भोसकलं - Girl Stabbed To Death - GIRL STABBED TO DEATH

Girl Stabbed To Death : एकतर्फी प्रेमातून नराधमानं तरुणीच्या घरात घुसून खून केला. ही घटना हुबळी इथं आज पहाटे घडली. विश्वा असं त्या मारेकरी तरुणाचं नाव आहे. नेहा हिरेमठ पाठोपाठ पुन्हा तरुणीचा खून करण्यात आल्यानं नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

Girl Stabbed To Death
अंजली अंबिगेरा आणि विश्वा (ETV Bharat Marathi)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2024, 2:31 PM IST

बंगळुरू Girl Stabbed To Death : प्रेमाला नकार दिल्यानं संतापलेल्या नराधमानं तरुणीच्या घरात घुसून तिचा खून केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना हुबळीतील वीरपुरा गुढी परिसरात बुधवारी पहाटे घडली. अंजली अंबिगेरा (20) असं खून झालेल्या तरुणीचं नाव असून विश्वा (21) असं खून करणाऱ्या संशयित नराधमाचं नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तरुणीचा खून केल्यानंतर जमलेली गर्दी (Reporter)

बेंडीगेरी पोलीस ठाण्याच्या परिसरात वीरपूर गुडी इथं तरुणीवर चाकू हल्ला झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील हत्येचं कारण तपासलं जाईल. हे प्रेम प्रकरण आहे का याचा तपास केला जाईल. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचं पथक तयार करण्यात आलं. तपासानंतर या प्रकरणातील पुढील माहिती देण्यात येईल. - गोपाल बकोडा, जिल्हा पोलीस अधीक्षक, धारवाड

एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून :नराधम विश्वा हा गेल्या अनेक दिवसापासून विश्वा हा अंजलीवर एकतर्फी प्रेम करत होता. मात्र अंजली त्याला भाव देत नव्हती. त्यामुळे विश्वा हा संतापला होता. आज पहाटे तरुणी घरात झोपलेली असताना विश्वा तिच्या घरात घुसला. यावेळी त्यानं तरुणीच्या घरच्यांशी वाद घातला. त्यानंतर विश्वानं तरुणीवर चाकूनं वार करुन तिचा निर्घृण खून केला. चाकूचे वार केल्यानंतर विश्वा घटनास्थळावरुन पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एकमेकांच्या घरासमोर राहत होते नराधम विश्वा आणि तरुणी :वीरपूर गुडी इथं राहणाऱ्या नराधम विश्वा हा आणि अंजली हे एकमेकांच्या घरासमोर राहत होते. मात्र माथेफिरू विश्वानं तरुणीचा खून केल्यामुळे मोठी खळबळ उडाली. याबाबत बेंडीगेरी पोलिसांनी माहिती दिली. "बेंडीगेरी पोलीस ठाण्याच्या परिसरात वीरपूर गुडी इथं तरुणीवर चाकू हल्ला झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील हत्येचं कारण तपासलं जाईल. हे प्रेम प्रकरण आहे का याचा तपास केला जाईल. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचं पथक तयार करण्यात आलं. तपासानंतर या प्रकरणातील पुढील माहिती देण्यात येईल," अशी माहिती धारवाडचे जिल्हा पोलीस अधीक्षक गोपाल बकोडा यांनी दिली.

नेहा हिरेमठ प्रकरण ताजं असतानाच दुसरी घटना :नराधम विश्वानं अंजलीचा खून केल्यानंतर परिसरात मोठी दहशत पसरली आहे. याबाबत अंजलीच्या बहिणीनं घटनेबाबतची माहिती दिली. "विश्वा हा पहाटे पाच वाजता घरी आला. त्यानं माझ्या बहिणीला सोबत चालण्यासाठी धमकी दिली. मात्र तिनं माझ्या आजी आणि लहान बहिणीला सोडून कुठंही येणार नाही, असं ठणकावून सांगितलं. यानंतर विश्वानं तिच्यावर चाकून वार केले. या अगोदरही त्यानं माझ्या बहिणीला म्हैसूरला येण्यासाठी धमकावलं होतं," असंही पीडितेच्या बहिणीनं सांगितलं.

हेही वाचा :

  1. अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर कथित प्रियकराची आत्महत्या, मृतदेहाजवळ सापडले दोन मोबाईल
  2. ऐन मकर संक्रातीला बालिकेचा खून; क्रूर मारेकऱ्यांनी कानातल्या बाळ्या ओरबाडल्या
  3. Minor Girl Murder Thane: एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या करून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

ABOUT THE AUTHOR

...view details