मेष: हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपणास आपल्या वैवाहिक जोडीदारास त्यांच्या कामात मदत करावी लागेल. आपणास आपल्या व्यापाराकडं सुद्धा लक्ष द्यावं लागेल. प्रणयी जीवनात प्रेम पाहावयास मिळेल. या आठवड्यात आर्थिक बाबींमुळं होणारी जास्त चिंता ही डोकेदुखीस कारणीभूत ठरू शकते. आपलं नशीब बलवत्तर असल्यानं आपल्या आर्थिक स्थितीत हळू - हळू सुधारणा होत असल्याचं दिसत आहे. भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या भागीदारावर नजर ठेवावी लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती नवीन नोकरीचा विचार करू शकतात. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. उच्च शिक्षणात घवघवीत यश मिळू शकतं. आवडते विषय शिकण्याची संधी मिळेल. आत्मविश्वास उंचावेल. प्रकृतीत विशेष सुधारणा होणार नाही. रोजच्या दिनचर्येत थोडा बदल कराल.
वृषभ :हा आठवडा आपल्यासाठी सामान्याहून चांगला असेल. या आठवड्यात प्रेमीजन आपल्या प्रेमिकेस आपल्या मनातील विचार सांगू शकतील. विवाहितांच्या वैवाहिक जोवनात प्रेमळपणा दिसून येईल. या आठवड्यात विवाह इच्छुकांसाठी योग्य प्रस्ताव आल्यानं ते खुश होतील. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. उच्च शिक्षणासाठी हा आठवडा अनुकूल आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कनिष्ठांशी वाद होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. व्यापारी आपल्या व्यापाराची वृद्धी करण्यात यशस्वी होतील. प्रकृतीत हळू-हळू सुधारणा होत असल्याचं दिसू लागेल. आर्थिक स्थितीत चढ-उतार येतील. या आठवड्यात आपण वाढीव खर्चामुळं त्रस्त झाल्याचं दिसून येईल. कुटुंबियांचं सहकार्य मिळेल. कुटुंबियांसह एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचे आयोजन कराल. त्यासाठी सुद्धा आपला खर्च जास्त होईल.
मिथुन :हा आठवडा आपणास अनुकूल आहे. या आठवड्यात आपणास नकारात्मकते पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा लागेल. आपण जर कोणाशी नवीन नाते जुळवत असाल तर त्याचा पूर्ण विचार करूनच निर्णय घ्यावा. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचं दिसून येईल. विद्यार्थ्यांना हा आठवडा अनुकूल आहे. त्यांनी जर नियमानुसार अध्ययन केले तर त्यांना परीक्षेत चांगले परिणाम मिळतील. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती नोकरीतील प्रगती पाहून अत्यंत खुश झाल्याचं दिसून येईल. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यापारास पुढे नेण्यासाठी नव - नवीन युक्त्यांचा वापर करावा लागेल. प्रकृतीत पूर्वी पेक्षा जास्त सुधारणा होईल. आपले खर्च वाढतील. एखाद्या ठिकाणी फिरावयास गेल्यामुळे, खाण्या - पिण्यात इत्यादींसाठी खर्च होईल. गुंतवणूक करण्यास आठवडा अनुकूल आहे.
कर्क : हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचं दिसून येईल. कुटुंबियांचं सहकार्य मिळेल. प्रणयी जीवन सुखद होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. जे विद्यार्थी स्पर्धेसाठी तयारी करत असतील त्यांना त्यांच्या परिश्रमानुसार यश प्राप्त होईल. बदलत्या ऋतूमुळं प्रकृतीत चढ-उतार होत असल्याचं दिसू शकतं. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांना देण्यात आलेली कामे पूर्ण करून प्रगती करतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नवीन वाहन खरेदी करण्यासाठी सुद्धा पैसा खर्च करू शकता. घर सजावटीसाठी सुद्धा जास्त खर्च करावा लागू शकतो. विवाह इच्छुकांच्या विवाहा संबंधी बोलणी होण्याची संभावना आहे. घरात मांगलिक कार्यक्रमाचं आयोजन होईल. मातेकडून धनलाभ संभवतो.
सिंह: हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. मित्रांशी संबंध दृढ होतील. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचं दिसून येईल. प्रेमीजनांचे प्रणयी जीवन सुखावह होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. जे विद्यार्थी स्पर्धेची तयारी करत आहेत ते त्यात यशस्वी होतील. प्रकृतीत हळू - हळू सुधारणा होईल. आपल्या दिनचर्येत ध्यान-धारणा आणि योगासन यांचा समावेश केल्यास अति उत्तम. याआठवड्यात आपले खर्च सुद्धा जास्त होतील. आपण स्वतःसाठी आणि कुटुंबियांसाठी गरजेनुसार काही खरेदी कराल. नवीन वाहन सुद्धा खरेदी करू शकता. सरकारी क्षेत्राकडून काही लाभ संभवतो. या आठवड्यात आपणास कोणत्याही भांडणात किंवा शासकीय कार्यात हस्तक्षेप करणं टाळावं लागेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांची कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. व्यापारात सुद्धा आपणास लाभ प्राप्त होईल.
कन्या: हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेसह अत्यंत खुश असल्याचं दिसून येईल. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात एखाद्या प्रवासास जाण्याचा आनंद लुटू शकतील. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. विद्यार्थी स्पर्धे व्यतिरिक्त आपल्या अध्ययनावर सुद्धा लक्ष केंद्रित करतील. प्रकृतीत चढ - उतार होत असल्याचं दिसून येईल. एखाद्या चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आपल्यासाठी हितावह होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपली कार्यक्षमता दाखविण्याची संधी मिळेल. व्यापारी आपल्या व्यापार वृद्धीसाठी नवीन तंत्राचा स्वीकार करतील. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. गुंतवणूक करण्यासाठी हा आठवडा विशेष असा अनुकूल नाही. या आठवड्यात आपणास कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाण-घेवाण विचारपूर्वकच करावी लागेल.