रांची : झारंखंडमधील पहिल्या टप्प्यातील विधानसभा निवडणूक 2024 चा शंखनाद आजपासून सुरू झाला आहे. 43 मतदार संघातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली. झारखंडमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी गाजत आहे. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात 43 तर दुसऱ्या टप्प्यात 38 मतदार संघात मतदान होत आहे. झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2024 ला संपणार आहे. त्यापूर्वी राज्यात नवीन सरकार अस्तित्वात येणार आहे. झारखंडमध्ये नक्षल प्रभावित परिसर असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून तब्बल 950 बुथवर दुपारी 4 वाजतापर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत 59.28 टक्के मतदारानी मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे.
झारखंडमध्ये आज होत आहे विधानसभा निवडणुकीसाठी मतदान :झारखंड राज्यात आज सकाळपासून विधानसभा निवडणूक 2024 च्या मतदानाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी 7 वाजतापासून नागरिकांनी मतदानाला मोठी गर्दी केली आहे. झारखंडमधील तब्बल 43 मतदार संघात आज सकाळी 7 वाजतापासून सुरूवात झाली. त्यानंतर नागरिकांनी आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी घरातून बाहेर पडण्यास सुरूवात केली. झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार यांनी मतदान करुन नागरिकांना आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आवाहन केलं.
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणुकीची रणधुमाळी :झारखंडमधील विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 ला संपणार आहे. तर महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ नोव्हेंबर महिन्यातचं संपणार आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यात विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरू आहे. आजपासून झारखंडमधील निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सकाळी 7 वाजतापासून झारखंडमधील 43 मतदार संघात मतदान पार पडत आहे. तर उर्वरित 38 मतदार संघात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. नक्षलप्रभावित असलेल्या 950 मतदार संघात दुपारी 4 वाजतापर्यंत मतदान करण्यात येणार आहे.
निवडणुकीसाठी तगडा पोलीस बंदोबस्त :आज झारखंड राज्यातील 43 मतदार संघात तब्बल 15 हजार 344 मतदान केंद्रावर मतदान पार पडत आहे. विधानसभा निवडणूक 2024 चं मतदान शांततेत पार पडण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केंद्रीय निमलष्करी दलाच्या 200 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार झारखंड विधानसभा निवडणूक 2024 साठी पहिल्या टप्प्यात 683 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत.
हेही वाचा :
- "झारखंड सरकारकडून लाडकी बहीण योजनेची नक्कल", अजित पवारांचा इंडिया आघाडीला टोला - Majhi Ladki Bahin Yojana
- हेमंत सोरेन यांना मोठा धक्का; नाराज माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन करणार भाजपा प्रवेश - Champai Soren To Join BJP
- हेमंत सोरेन यांनी तिसऱ्यांदा घेतली झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, मनी लाँड्रिंग प्रकरणी झाली होती अटक - Jharkhand CM Hemant Soren