महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

एका हातात कोयता अन् दुसऱ्या हातात मुंडकं! बायकोची हत्या करून नवरा फिरला गावभर - बायकोची हत्या

Man Kills Wife : उत्तर प्रदेशात गुन्हेगारीनं नवा कळस गाठला आहे. येथे एका पतीनं कथित प्रेमसंबंधाच्या संशयावरून आपल्या पत्नीसोबत असं काही केलं, जे वाचून तुम्हालाही धक्का बसेल. काय आहे हे प्रकरण, जाणून घेण्यासाठी पूर्ण बातमी वाचा.

UP Crime
UP Crime

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 17, 2024, 12:00 PM IST

बाराबंकी (उत्तर प्रदेश) Man Kills Wife : उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी येथे एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीनं आधी कोयत्यानं आपल्या पत्नीचा शिरच्छेद केला. त्यानंतर तो एका हातात तिचं कापलेलं मुंडकं आणि दुसऱ्या हातात कोयता घेऊन रस्त्यावर फिरू लागला. पोलिसांनी शनिवारी (17 फेब्रुवारी) त्याला अटक केली.

कथित प्रेमसंबंधावरून हत्या : अनिल कुमार असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तो बसरा गावातील रहिवासी आहे. त्याने आपल्या पत्नीचे कथित प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून कोयत्यानं तिचं मुंडकं कापलं. या जोडप्याच्या लग्नाला आठ वर्ष झाली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बसरा गावात शुक्रवारी ही घटना घडली. येथे आरोपी आपल्या पत्नीच्या मुंडक्यासह अनवाणी चालताना दिसला होता.

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल :या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये, आरोपी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही जणांना कोयता दाखवताना दिसतोय. घटनेची माहिती मिळताच फतेहपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला ताब्यात घेतलं. बाराबंकीचे पोलीस अधीक्षक दिनेश कुमार सिंग यांनी आरोपीच्या अटकेची पुष्टी केली आहे.

लग्नाला झालीत आठ वर्षे :"आरोपी अनिल कुमार याला अटक करण्यात आली आहे. महिलेचा मृतदेह देखील ताब्यात घेतला असून, तो पोस्टमार्टम तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या जोडप्याचं लग्न होऊन आठ वर्ष झाली होती आणि त्यांना दोन मुलं आहेत," असं एसपी सिंग यांनी सांगितलं. या प्रकरणाचा अधिक तपास जारी असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

हे वाचलंत का :

  1. 14 दिवसांत 10 हत्या! गृहमंत्र्यांच्या शहरात चाललंय तरी काय?
  2. लव्ह ट्रॅन्गल की आणखी काही? गुवाहाटीतील हॉटेलमध्ये महाराष्ट्रातील व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ
  3. नाष्टा केला नसल्यानं मुलानं केली आईची हत्या, बंगळुरुतील धक्कादायक घटना

ABOUT THE AUTHOR

...view details