नवी दिल्ली Union Budget 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाठिंबा दिला आहे. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पाठिंब्यावर केंद्रातील सरकार तग धरुन आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्प 2024 ( Budget 2024 LIVE Updates ) मधून बिहारला केंद्र सरकारनं मोठं गिफ्ट दिलं आहे. बिहारला रस्ते बांधणीसाठी तब्बल 26 हजार कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. बिहारमधील पाटणा, बक्सर भागलपूर एक्सप्रेस वे, बोधगया राजगीर, वैशाली दरभंगा या महामार्गासाठी हा निधी देण्यात घोषित करण्यात आला आहे. या महामार्गासाठी गंगा नदीवर पूल बांधण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे. त्यासह बिहारमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालय बांधण्याचीही घोषणा करण्यात आली आहे.
बिहारच्या रस्ते बांधणीला 26 हजार कोटीचा निधी :बिहारमधील नितीश कुमार यांच्या सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिल्यानं सरकार सत्तेत आलं आहे. त्यामुळे नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला केंद्रात महत्वाचं स्थान आहे. आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत असताना बिहारला मोठं गिफ्ट दिलं आहे. बिहारमधील रस्ते बांधणीला 26 हजार कोटीचा निधी जाहीर केला आहे. त्यामुळे बिहारला ही सरकारला पाठिंबा दिल्याची भेट असल्याची चर्चा आता करण्यात येत आहे.