टिकमगड : Three kidneys in stomach of Retired officer : निसर्ग जेव्हा आपला करिष्मा दाखवतो तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. असाच एक प्रकार मध्य प्रदेशातील टिकमगड जिल्ह्यातून समोर आला आहे. येथे निवृत्त पोलीस कर्मचारी खलील मोहम्मद यांच्या शरीरात तीन किडनी आढळून आल्या आहेत. मात्र, मोहम्मद यांना कोणताही त्रास नसून ते सामान्य माणसाप्रमाणे जगत आहे.
मोहम्मद फुटबॉल खेळत होते : पोलीस निरीक्षक पदावरून निवृत्त झालेले शहरातील खलील मोहम्मद हे सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. खलील मोहम्मद यांच्या शरीरात दोन नाही तर तीन किडन्या आहेत. त्यांना याबद्दल माहिती नव्हती. परंतु, एकदा खलील मोहम्मद फुटबॉल खेळत होते. दरम्यान, त्यांना पोटात खूप दुखणं सुरू झालं. तसंच, लघवी करतानाही त्रास जाणवायला लागला. त्यानंतर त्यांनी उपचार घेतले. मात्र, फरक न पडल्याने त्यांनी झाशीतील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेत तपासणी केली. त्यामध्ये त्यांना शरीरात दोन नाही तर तीन किडन्या असल्याचं समोर आलं.
हळूहळू शरीरात मुंग्या येणं : टिकमगड शहरातील लक्कडखाना येथील रहिवासी सेवानिवृत्त टीआय खलील मोहम्मद हे 64 वर्षांचे आहेत. पोलिसांतून निवृत्ती घेतल्यानंतर खलील मोहम्मद स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी खेळात सक्रिय असतात. एकदा ते फुटबॉल खेळत असताना अचानक त्यांच्या पोटात दुखू लागलं. तसंच, हळूहळू शरीरात मुंग्या येणं आणि लघवी करताना जळजळ होऊ लागलं. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांकडून सल्ला घेत तपासणी केली. त्यानंतर आपल्या शरीरात चक्क तीन किडन्या असल्याचं समोर आलं.
ररोज 6 ते 7 लिटर पाणी पिण्याचा सल्ला : येथील डॉक्टर अनुराग जैन यांनी खलील यांना तज्ञ डॉक्टर राज यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर खलील यांच्या किडनीबद्दल निदान झालं. दरम्यान, याबाबत बोलताना खलील म्हणाले, ही आपल्या आईची देणगी आहे. ही गोष्ट समोर आल्यानंतर आपल्याला डॉक्टरने काळजी घेण्याचा सल्ला दिला असंही त्यांनी सांगितलं आहे. तिसऱ्या किडनीमुळे होणारा त्रास टाळण्यासाठी खलील मोहम्मद यांना दररोज 6 ते 7 लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे.