श्रीनगर: बारामुल्ला लोकसभा मतदारसंघामध्ये २० मे रोजी मतदान होणार आहे.अनंतनाग-राजौरी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. अशा स्थितीत दोन हल्ले झाल्यानं निवडणुकीवर दहशतवादी हल्ल्याचं सावट निर्माण झालयं. नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि भाजपसह जम्मू-काश्मीरमधील बहुतांश सर्वच राजकीय पक्षांनी दहशवादी हल्ल्यांचा निषेध केला
माजी सरपंचासह पर्यटकांवर हल्ला-पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशिरा शोपियान जिल्ह्यातील हीरपोरा येथे दहशतवाद्यांनी एजाज अहमद शेख यांच्यावर गोळीबार केला. त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील यन्नार भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात जयपूर येथील एक जोडपे जखमी झाले. जखमी झालेले फरहा आणि तिचा पती तबरेज यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
दहशतवादी हल्ल्याचे उमटले पडसाद-जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात शनिवारी दहशतवाद्यांनी माजी सरपंचाची हत्या केल्यानंतर पडसाद उमटले आहेत. जम्मू आणि काश्मीर भाजाप मीडिया सेलचे प्रभारी साजिद युसूफ शाह म्हणाले, " माजी सरपंच एजाज अहमद शेख यांच्या हीरपोरा येथे झालेल्या हत्येचा तीव्र निषेध करत आहोत. या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या एजाज अहमद यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भाजप ठामपणं उभी आहे. " जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी एक्स मीडियावर म्हटले की, 'आम्ही पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतो. हल्ल्यात दोन पर्यटक जखमी झाले आहे. त्यानंतर शोपियानच्या हुरपोरामध्ये सरपंचावर हल्ला करण्यात आला. निवडणुका कोणतेही कारण नसताना पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या काळात हल्ला झाल्यानं हा चिंतेचा विषय आहे.
सुरक्षा दलाकडून संयुक्त शोध मोहिम सुरू-काश्मीर पोलिसांनी एक्स मीडियावर पोस्ट करत परिसरात नाकेबंदी करण्यात आल्याचं सांगितलं. अनंतनाग आणि शोपियानमधील भागांमध्ये नाकेबंदी करण्यात आली असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सीमा पोलीस चौकी सन्यालच्या संपूर्ण परिसरात ताबडतोब सतर्कतेचा इशारा देण्यात आला. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलीस, सैन्यदल आणि बीएसएफच्या जवानांना मोहिमेसाठी रवाना करण्यात आले.
हेही वाचा-
- जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, जवानाचा मृत्यू, दुसऱ्या जवानाची प्रकृती चिंताजनक - Terrorist attack Air Force convoy
- 26/11 हल्ला प्रकरणी उज्ज्वल निकम यांनी सत्य लपवलं; प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप - Prakash Ambedkar On Ujjwal Nikam