नवी दिल्ली NEET-UG 2024 Row Supreme Court Hearing : NEET-UG 2024 परीक्षा रद्द करण्याबाबत आणि इतर मागण्यांबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं चुकीचं कृत्य (पेपरफुटीत सहभाग) करणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी केंद्र सरकार आणि एनटीएनं काय कारवाई केली?, अशी विचारणा केली. पेपरफुटी झाली आहे हे सर्वमान्य सत्य आहे आणि त्याचं स्वरूप आम्ही ठरवत आहोत, असं न्यायालय म्हणालं.
सावधगिरी बाळगली पाहिजे : दोन विद्यार्थ्यांचा पेपरफुटीमध्ये हात आहे म्हणून तुम्ही संपूर्ण परीक्षा रद्द करू शकत नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळं आपण पेपरफुटीच्या स्वरूपाबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे, असंही न्यायालयानं नमूद केलं. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड म्हणाले की, न्यायालय 23 लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी आणि करिअरशी संबंधित आहे, त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकरण इतके व्यापक होते की नाही हे शोधणे आवश्यक आहे की, फेरपरीक्षेचे आदेश द्यावे लागले.