नवी दिल्ली SC Grants Bail To Manish Sisodia : दिल्ली दारू घोटाळ्यात अटक करण्यात आलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयानं आपला पोसपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासह कोणत्याही साक्षिदारांवर दबाव टाकण्यात येऊ नये, अशी अटही सर्वोच्च न्यायालयानं जामीन देताना मनीष सिसोदिया यांना घातली आहे.
मनीष सिसोदिया यांना जामीन :सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठात मनीष सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी निर्णय देताना न्यायमूर्ती बी आर गवई यांनी जामीन मंजूर करताना, "आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर जलद सुनावणी घेणं हा त्यांचा अधिकार आहे. मनीष सिसोदिया यांना पुन्हा ट्रायल न्यायालयात पाठवणं योग्य ठरणार नाही. मनीष सिसोदिया यांना 18 महिन्याच्या कारावासाची शिक्षा तुरुंगवास झाला आहे. अद्याप हा खटाल सुरूही झाला नाही. त्यामुळे मनीष सिसोदिया यांना जलद न्यायालयात जाण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवता येत नाही. ट्रायल कोर्ट आणि हायकोर्टानं याकडं लक्ष घालायला हवं."