महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीवर लैंगिक अत्याचार; फूड डिलिव्हरी बॉयला अटक - sexually assaulting on young woman - SEXUALLY ASSAULTING ON YOUNG WOMAN

Sexually Assaulting : ऑनलाइन जेवण ऑर्डर करणाऱ्या एका तरुणीचा फूड डिलिव्हरी बॉयनं लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. या प्रकणात डिलिव्हरी बॉय 'आकाश'ला पोलिसांनी अटक केली आहे.

Aexually Assaulting
Aexually Assaulting

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 21, 2024, 10:21 PM IST

बेंगळुरू Sexually Assaulting: फूड डिलिव्हरी बॉयनं सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बेंगळुरूत घडली आहे. या प्रकरणी एचएएल पोलिसांनी एका डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे. 30 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीनं ऑनलाइन जेवणाचं पार्सल मागवलं होतं. तिची ऑर्डर घेऊन आल्यानंतर डिलिव्हरी बॉयनं तिचा लैंगिक छळ केला, असं तिनं दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

'मी दरवाजा उघडताच डिलिव्हरी बॉयनं मला 'मॅडम मी तुमचं वॉशरूम वापरू शकतो का? असं विचारलं.' मी त्याला वॉशरूमकडं बोट दाखवलं. तो बाहेर येताच मी त्याला निघायला सांगितलं. मात्र, त्यानं मला परत पिण्यासाठी पाणी मागितलं. मी पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेले असाता, तो तरुण माझ्या पाठीमागं आला. त्यावेळी त्यानं माझा हात धरत विनयभंग केला. मी आरडाओरड केल्यानंतर त्यानं तिथून पळ काढला' - सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणी

तरुणीशी केलं गैरवतरनं : अटक करण्यात आलेल्या डिलिव्हरी बॉयचं नाव आकाश असून तो मूळचा चिंचोली कलबुर्गी येथील रहिवाशी आहेत. एका अभियंता तरुणीनं 17 मार्च रोजी ऑनलाइन जेवण ऑर्डर केलं होतं. त्यावेळी आकाश जेवणाचं पार्सल घेऊन तरुणीच्या घरी आला होता. तरुणीनं दरवाजा उघडल्यानंतर आकाशनं तिला जेवणाचं पार्सल दिलं. त्यानंतर तरुणीनं आकाशला पाणी पाणी हवं आहे का? अशी विचारणा केली. त्यावर आकशनं मान हलवत होकार दिला. त्यानंतर आकाश तिथून निघून गेला. मात्र, काही वेळानं तो परत आला. त्यानंतर आकाशनं तरुणीला वॉशरूमचा वापर करु देण्याची विनंती केली. तरुणीनंही त्याला वाशरुमचा वापर करण्याची परवाणगी दिली. त्यानंतर तरुणीनं आकाशला रुमधून जाण्यास सांगितलं, तेव्हा आकाशनं परत पिण्यासाठी पाण्याची मागणी केली. त्यावर तरुणी पाणी आणण्यास किचनमध्ये गेली असता आकाशनं पाठीमागून येत तरुणांचा हात धरून गैरवतरनं केलं, असा आरोप तरुणीनं केला आहे.

आरोपीला आकाशला अटक :घाबरलेल्या तरुणीनं आरडाओरडा करताच आकाशनं तिच्या गालावर चापट मारत तेथून पळ काढला, असं तिनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. तरुणीनं दिलेल्या तक्रारीवरून एचएएल पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला आकाशला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

हे वाचलंत का :

  1. Mumbai Crime : चालत्या लोकलमध्ये तरुणीशी अश्‍लील चाळे, आरोपी तरुणाला अंधेरी रेल्वे स्थानकावर अटक
  2. Thane Crime : 2 वर्षाच्या चिमुरडीवर 15 वर्षीय मुलाचा लैंगिक अत्याचार, वारंवार करत होता असे कृत्य
    THANE CRIME : धक्कादायक ! ४ वर्षीय चिमुरडीवर लैगिंक अत्याचार करणाऱ्या २६ वर्षीय नराधमाला बेड्या

ABOUT THE AUTHOR

...view details