हैदराबादSix Maoists Killed In Encounter - तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यात गुरुवारी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. पोलिसांनी चकमकीत सहा नक्षलवाद्यांना ठार केले.
छत्तीसगडच्या सीमेजवळील काराकागुडेम मंडलच्या रघुनाथपलेमजवळ पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तेलंगणातील काही प्रमुख नक्षलवादी नेते ठार झाल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस पथकांकडून शोध मोहिम सुरू असताना जंगल परिसरात अचानक चकमक झाली. चकमकीदरम्यान गोळ्या लागल्यानं दोन पोलिसही जखमी झाले आहेत.
पोलिसांनी सांगितलं की, गेल्या 10-15 वर्षांतील सातत्यानं नक्षलवादी विरोधातील मोहिमेतील तेलंगणात नक्षलवाद्यांचा पूर्णपणे नायनाट झाला आहे. परंतु नक्षलवादी अजूनही छत्तीसगड आणि महाराष्ट्रासारख्या शेजारील राज्यांच्या सीमेवर असलेल्या भागात कार्यरत आहेत आहेत. बंदी घातलेल्या सीपीआयचे (माओवादी) नेतृत्व तेलंगणातील लोकांच्या हाती असणं ही चिंतेची बाब असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. गुरुवारी चकमकीमुळे तेलंगणात पुन्हा नक्षलवादी कारवाया सुरू करण्याच्या प्रयत्नात असलेल्या माओवाद्यांना मोठा धक्का बसला आहे.
मचरला येसोबू ठार-नुकतेच छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी सहा महिलांसह नऊ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर तेलंगणात दोन दिवसांनी नक्षलवादी ठार केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत तेलंगणाचा प्रमुख नक्षलवादी नेता माचेर्ला असोबू याचाही मृत्यू झाला. नक्षलवादी नेता मचरला येसोबू याचा छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. त्याला येल्लान्ना, जगन आणि रणदेव दादा या नावांनीही ओळखले जात होते. एसोबू, वय 71 हा नक्षलवादी संघटनेच्या केंद्रीय समिती सदस्य आणि महाराष्ट्रासह छत्तीसगडचा प्रभारी होता. तो हनुमाकोंडा जिल्ह्यातील काझीपेट मंडलातील टेकुलागुडेमचा रहिवासी होता.
नक्षलवादी चळवळीतील नेतृत्व संपुष्टात- येसोबूनं केवळ पाचवीपर्यंतच औपचारिक शिक्षण घेतले होते. सरंजामशाहीविरोधातील कथित लढ्यात सामील होण्यापूर्वी त्यानं सुरुवातीला मजूर म्हणून काम केलं. शेवटी कट्टरपंथी युवा संघटनेचं नेतृत्व केले. 1991 मध्ये, तो पीपल्स वॉर अण्णासागर दलात सामील झाला, नक्षलवादी गटातील एक प्रमुख नेत्याचं स्थान मिळविलं. येसोबूच्या मृत्युमळे त्याचे ३३ वर्षांचे नक्षलवादी चळवळीतील नेतृत्व संपुष्टात आले. येसोबूच्या पत्नी लक्ष्मीचे गेल्या वर्षी निधन झाले. त्याच्या पश्चात तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्याचा मुलगा महेश चंद्र यानं पित्याच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केलं. पोलिसांनी येसोबूसाठी 5 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
दंतेवाडा आणि विजापूरमधील चकमकीत 9 ठार-दंतेवाडा आणि विजापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील लोहगाव पुरंगेल उंड्री येथील जंगलात सोमवारी पोलीस-नक्षलवादी चकमकीत झाली. या चकमकीत 9 सशस्त्र गणवेशधारी नक्षलवादी ठार झाले. चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी रणधीर (25 लाख) आणि पाच लाखांचे बक्षीस असलेले 5 एसीएम, आंध्र-ओडिशा बॉर्डर स्पेशल झोनल कमिटीचे सदस्य, पश्चिम बस्तर आणि दरभा विभागासह दरभा विभागाचे सदस्य यांचा समावेश आहे. छत्तीसगडमधील दंतेवाडा-विजापूर सीमेवरील लोहगाव, पुरंगेल आणि उंड्री जंगल परिसरात चकमकीत पीएलजीए सदस्या शांती, क्षेत्र समिती सदस्या सुशीला मडकम, कट्टेकल्याण क्षेत्र समिती सदस्य गंगी मुचाकी, सुरक्षा दल सदस्या ललिता, आंध्र-ओडिशा बॉर्डर स्पेशल झोनल कमिटी गार्ड कविता आणि मलंगीर क्षेत्र समिती सदस्य कोसा मडवी यांचा समावेश आहे.
मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त-सुरक्षा दलांनी SLR 1 नग, 303 रायफल 2 नग, टाटा कार्बाइन (9mm) 01 नग, 8mm रायफल 1 नग, 315 बोअरची रायफल 1 नग, 12 बोअरची रायफल 2 नग यांचा समावेश आहे. BGL लाँचसह मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त केला. दंतेवाडा जिल्ह्यातील एलिट फोर्स डीआरजी, 230 कॉर्प्स यंग प्लाटून यांच्या संयुक्त कारवाईत 2 लोडेड बंदूक आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा-
- तब्बल 25 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण; नक्षलवाद्यांच्या अत्याचारांमुळे सुरक्षा दलापुढं टाकली शस्त्र खाली - 25 Naxalites Surrender
- सात चकमकी, दोन जणांचा खून; छत्तीसगड, ओडिशात कारवाया करणाऱ्या जहाल नक्षलवादी महिलेचं आत्मसमर्पण - Naxal Woman Surrender In Gadchiroli