हैदराबाद Shravan 2024 :हिंदू धर्मात श्रावण महिनाअत्यंत पवित्र मानला जातो. श्रावण महिण्यात भगवान शंकराची पूजा केल्यानं (Shravan Diet Food) सर्व इच्छा पूर्ण होतात, असा विश्वास आहे. शिवाय प्रत्येक सोमवारी अनेक जण उपवास ठेवतात. उपवास उपवासासोबत शंकराची पूजा केली जाते. जिवसभराच्या उपवासामुळे शरीराला काही प्रमाणात थकवा जाणवू शकतो. याचा परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता असते. यासाठी या काळात शरीराची विशेष काळजी घेतली पाहिजे. चला तर मग जाणूण घेऊया श्रावण महिन्यात उपवासाच्या दिवशी ऊर्जात्मक आणि उत्साही राहण्याकरिता आहारत काय घ्यावं
- या गोष्टींची घ्या काळजी
- उपावासाच्या दिवशी जास्त काळ पोट रिकामं राहतं त्यामुळं अॅसिडीटी वाढू शकते. म्हणून थोड्या-थोड्या वेळात उपवासाचे पदार्थ खात रहावे.
- उपावासाच्या दिवशी शरीरात पाण्याची कमतरता भासू देवू नका. दररोज ५-७ ग्लास पाणी द्या.
- पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांचा आहारात समावेश करा. जसं की, टरबूज, द्राक्षे, लिची, संत्री, मोसंबी
- उपवासाच्या दिवसांत जास्त तळलेले पदार्थ खाऊ नका.
- शिंगाड्याचं पीठ आणि बटाटे जास्त प्रमाणात खाऊ नयेत.
- श्रावणात काय खावं
नारळ पाणी : नारळ पाणी प्यायल्यानं शरीर हायड्रेटेड आणि ऊर्जादायी राहण्यास मदत होते. नारळाची खीर किंवा लाडू खावू शकता.
फळं : फळं खाणं आरोग्यासाठी चांगलं आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. यात पोटॅशियम, व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं. फळांव्यतिरिक्त काही भाज्या तुम्ही खाऊ शकता. लौकी, भोपळा आणि आलूचा यामध्ये समावेश असावा.
दुग्धजन्य पदार्थ :उपवासाच्या दिवसात दूध,दही, पनीर, लस्सी तसच ताकाचं आवर्जून सेवन करावं. यामुळं पोट जास्त काळ भरलेलं राहतं.