नवी दिल्ली Sachin Tendulkar Kashmir Visit : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा पत्नी अंजली आणि मुलगी सारासोबत काश्मीरला गेला होता. यामध्ये त्यांनी त्यांच्या सुट्टीतील एक मंत्रमुग्ध करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्यांनी जगाला भारतातील 'अनेक रत्नांपैकी एक' असलेलं काश्मीरचं सौंदर्य तेथे येऊन बघण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी निमंत्रित केलं. सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर कश्मीरला जाताना, त्याच्या संपूर्ण प्रवासाचा सारांश देणारा एक व्हिडिओ शेअर केला आणि 'माझ्या काश्मीर ट्रिपचे उत्कृष्ट क्षण' यासह व्हिडिओ सुरू केला आणि कोट देऊन समाप्त झाला. काश्मीर इतके सुंदर होते की, मी मंत्रमुग्ध झालो होतो, असं तो सांगतोय.
आदरातिथ्याने भारावले सचिनचे कुटुंब : सचिनच्या प्रवासातील प्रत्येक महत्वाचा क्षण व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. मंदिराच्या भेटीपासून, काश्मीर विलो बॅट बनवणाऱ्यांशी संभाषण, स्थानिक चहाच्या स्टॉलवर थांबणे, बर्फवृष्टीचा आनंद घेणे, हात नसलेले अमीर हुसेन लोन यांना भेटणे आणि बरेच काही या व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते. त्यांनी पुढे लिहिले की, 'जम्मू आणि काश्मीर माझ्या आठवणीत एक सुंदर अनुभव राहील. आजूबाजूला बर्फ होता पण लोकांच्या विलक्षण आदरातिथ्यामुळे आम्हाला उबदार वाटले. पंतप्रधान मोदी आणि काश्मीरचं कौतुक करणारे शब्दही सचिननं यावेळी त्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिले आहेत.