महाराष्ट्र

maharashtra

बसपा नेते के आर्मस्ट्राँग हत्या प्रकरण : पोलिसांनी केलं मारेकऱ्याचं एन्काऊंटर - Rowdy Encounter in Chennai

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 14, 2024, 1:27 PM IST

Rowdy Encounter in Chennai : चेन्नईमधील बहुजन समाज पक्षाचे नेते के आर्मस्ट्राँग यांची हत्या करण्यात आल्यानं देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील मारेकऱ्याला घटनास्थळी नेल्यानंतर त्यानं पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे पोलिसांनी प्रत्युत्तरात गोळीबार केल्यानं मारेकरी थिरुवेंगडम याचा मृत्यू झाला.

Rowdy Encounter in Chennai
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

चेन्नई Rowdy Encounter in Chennai :बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के आर्मस्ट्राँग यांची चेन्नईत हत्या करण्यात आल्यानं देशभर खळबळ उडाली. या प्रकरणी चेन्नई पोलिसांनी 11 मारेकऱ्यांना अटक केली आहे. या मारेकऱ्यांना 5 दिवस पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. यातील एका मारेकरी थिरुवेंगडम याला घटनास्थळी तपासण्यासाठी नेण्यात आलं होतं. मात्र मारेकरी थिरुवेंगडम यानं पोलिसांवर हल्ला केल्याचा दावा चेन्नई पोलिसांनी केला. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी प्रत्युत्तर दिलं. मात्र पोलिसांनी केलेल्या गोळीबारात थिरुवेंगडम याचा मृत्यू झाला आहे. थिरुवेंगडम याचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

घटनास्थळ (ETV Bharat)

लपवलेली शस्त्र दाखवण्यासाठी नेला होता मारेकरी :पोलिसांच्या चकमकीत थिरुवेंगडमचा मृत्यू झाला. बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के. आर्मस्ट्राँग यांच्या हत्येप्रकरणी थिरुवेंगडम याला अटक करण्यात आली होती. चेन्नईच्या माधवरम परिसरात बहुजन समाज पक्षाचे नेते आर्मस्ट्राँग यांच्या हत्येनंतर शस्त्र लपवण्यात आली होती. ही लपवून ठेवलेली शस्त्रं जप्त करण्यासाठी पोलिसांनी तिरुवेंगडमला तपासासाठी नेलं होतं. मात्र थिरुवेंगडम यानं लपवलेल्या देशी बंदुकीनं पोलिसांवर गोळ्या घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चेन्नई पोलिसांनी त्याला स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तर दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र यावेळी पोलिसांनी केलेल्या हल्ल्यात थिरुवेंगडमचा मृत्यू झाला.

मारेकऱ्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी :बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के आर्मस्ट्राँग यांची हत्या करणाऱ्या 11 मारेकऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या मारेकऱ्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. त्यामुळे हत्या केल्यानंतर या मारेकऱ्यांनी शस्त्र कुठं लपवली याचा तपास पोलीस घेत होते. यावेळी अचानक थिरुवेंगडम यानं लपवून ठेवलेल्या शस्रानं पोलिसांवर हल्ला केल्याचा दावा पोलिसांनी केला. या चकमकीत मृत झालेल्या थिरुवेंगडमच्या उजव्या खांद्यावर आणि छातीत गोळ्या लागल्या आहेत. पोलिसांनी थिरुवेंगडमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चेन्नईच्या स्टॅनले सरकारी रुग्णालयात नेला. उच्चपदस्थ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

  1. कुलगाममध्ये दोन ठिकाणी चकमक; सहा दहशतवादी ठार, अकोल्याच्या प्रवीण जंजाळ यांच्यासह एका जवानाला वीरमरण - ENCOUNTER IN KASHMIR
  2. चाईबासा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, चार नक्षलवादी ठार - encounter in Chaibasa
  3. अबुझमदमध्ये 8 नक्षलवादी ठार, 161 दिवसांत 141 माओवाद्यांचा खात्मा - Chhattisgarh Naxal Encounter Update

ABOUT THE AUTHOR

...view details