महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भरधाव कार आणि ट्रकची जोरदार धडक; एकाच कुटुंबातील सहा जण ठार - Road Accident In Bikaner - ROAD ACCIDENT IN BIKANER

Road Accident In Bikaner : भरधाव कार रोडच्या बाजुला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. ही घटना बिकानेरमधील महाजन पोलीस ठाण्याच्या परिसरात गुरुवारी रात्री घडली.

Road Accident In Bikaner
घटनास्थळावरील ट्रक (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 19, 2024, 9:29 AM IST

जयपूर Road Accident In Bikaner : भरधाव कार आणि ट्रकची जोरदार धडक झाल्यानं या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जण ठार झाले. ही खळबळजनक घटना भरतमाला महामार्गावर बिकानेरच्या महाजन पोलीस ठाण्याच्या परिसरात गुरुवारी रात्री घडली. कार आणि ट्रकची धडक इतकी भीषण होती, की कारचा चक्काचूर झाला आहे. भरधाव कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळल्यानं हा भीषण अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भरधाव कार अनियंत्रित झाल्यानं झाला अपघात : भरधाव वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. त्यामुळे कारमध्ये असलेले दोन जण कारच्या बाहेर फेकले गेले, तर चार जण कारमध्ये जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी नागरिकांच्या मदतीनं वाहनात अडकलेले मृतदेह बाहेर काढले.

एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू : कारमधील सर्व प्रवासी हे हरियाणातील डबवली इथले होते. हे सहा जणंही एकाच कुटुंबातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मृतांमध्ये आई, वडील, मुलगी, मुलगा पत्नी आणि चालक आदींचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्या मुलीला पिलीबंगा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले.

उभ्या ट्रकवर जाऊन आदळली कार :महाजन पोलीस ठाण्याच्या परिसरात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा नागरिकांचा मृत्यू झाला. भरधाव वेगात असलेली कार महाजन परिसरात अनियंत्रित झाली. ही कार उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. ट्रकच्या मागून कार धडकल्यानं कारचा चक्काचूर झाला. अपघात झाल्याचं कळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नागरिकांनी पोलिसांना माहिती देत बचावकार्य सुरू केलं. मात्र भीषण अपघात असल्यानं कारमधील सहा जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा :

  1. मुंडन संस्काराला जाताना चालकाला लागली 'डुलकी'; ट्रक आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात, 6 ठार - Road Accident In Patna
  2. मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात: भरधाव ट्रक दुभाजक तोडून कारवर आदळल्यानं कारमधील चार जण ठार - Accident On Mumbai Agra Highway
  3. भिवंडीत एकाच दिवशी दोन अपघात; 3 जणांचा मृत्यू, कसा घडला अपघात? - Road Accident News

ABOUT THE AUTHOR

...view details