मुंबई Rape Case On Sajjan Jindal Fake : देशातील प्रख्यात उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्यावर एका अभिनेत्रीनं कथित बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. या अभिनेत्रीच्या तक्रारीवरुन उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा 2 महिन्यांपूर्वी दाखल करण्यात आला होता. मात्र ही तक्रार खोटी असल्याचं मुंबई पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी न्यायदंडाधिकारी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला. हा आरोप आणि गुन्हा खोटा असल्याचं मुंबई पोलिसांच्या अहवालात म्हटलय. त्यामुळे सज्जन जिंदाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सज्जन जिंदाल यांच्याविरोधात अभिनेत्रीची बलात्काराची तक्रार :"उद्योगपती सज्जन जिंदाल यांनी एका 2023 मध्ये लग्नाचे वचन दिलं होतं. त्या बहाण्यानं त्यांच्या मुंबईतील कार्यालयामध्ये तिची भेट झाली असता, तिच्यावर बलात्कार केला," अशी तक्रार त्या अभिनेत्रीनं वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये दिली होती. परंतु यासंदर्भात वांद्रे कुर्ला संकुल पोलीस ठाणे यांच्या वतीनं तपास करुन त्याबाबतचा क्लोजर रिपोर्ट वांद्रे न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सादर केला. या अहवालात गुन्हा खोटा असल्याचं पोलिसांनी नमूद केलं आहे.
ओळख झाली दुबईत बलात्कार झाला मुंबईत :अभिनेत्रीची दुबईमध्ये जे एस डब्ल्यू कंपनीचे संचालक सज्जन जिंदाल यांची क्रिकेट सामन्याच्या दरम्यान भेट झाली होती. त्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि 23 जानेवारी 2024 मध्ये त्या महिलेकडून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. अभिनेत्रीच्या तक्रारीवरुन सज्जन जिंदाल यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 376, 354 आणि कलम 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.