हैदराबाद Ramoji Rao Letter :रामोजी समूहाचे अध्यक्ष रामोजी राव यांनी त्यांच्या गौरवशाली जीवनकाळात अफाट व्यवसाय विश्व आणि मीडिया साम्राज्य निर्माण केलय. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल मीडियामध्ये पसरलेल्या या कंपन्यांमध्ये हजारो कर्मचारी काम करतात; त्याचबरोबर आदरातिथ्य-हॉटेल, चित्रपट, मनोरंजन तसंच FMCG क्षेत्रात रामोजी ग्रुपच्या उद्योगांचं मोठं जाळं पसरलेलं आहे.
या सर्वच उद्योगातील कर्मचाऱ्यांसाठी, माध्यम सम्राट रामोजी राव यांनी 'जबाबदारीचं इच्छापत्र' लिहिलं आहे. सहसा, वडील त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात त्यांच्या मुलांना मालमत्तेचं वाटप करण्यासाठी मृत्यूपत्र लिहितात. येथे चेअरमन रामोजी राव यांनी कर्मचाऱ्यांवर जबाबदारीचं मृत्युपत्र दिलेलं आहे. जसं वडील आपल्या मुलांसाठी इच्छापत्र लिहितात, तसंच त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी इच्छापत्र लिहिलं आहे. रामोजी राव यांना त्यांच्या कंपन्यांच्या समूहातील कर्मचारी हे त्यांच्या मुलांच्यापेक्षाही प्रिय होते. त्यांच्यासाठी त्यांनी काय लिहिलं असेल?
ही आहे रामोजी राव यांची प्रेरणादायी इच्छा :
"प्रत्येक कर्मचाऱ्याने सर्जनशीलतेने आव्हानांवर मात करून सक्षम आणि वचनबद्ध सैनिक म्हणून काम केलं पाहिजं. सदैव खंबीरपणे उभे राहण्यासाठी मी उभारलेल्या संस्था आणि प्रणालींचा पाया तुम्ही आहात."
रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितल्या प्रमाणे, 'माझ्या आयुष्याच्या आकाशात आता ढग जमा होत आहेत. पावसासाठी नाही, वादळांसाठी नाही - माझ्या संध्याकाळसाठी नवे रंग रंगवण्यासाठी.' अनेक दशके, मी एका अथक कार्यकर्त्याप्रमाणे धावत राहिलो, अनेक दशकांमधला वेळ नकळत, प्रत्येक पहाट माझ्या हृदयाला सूर्यदेवाच्या पहिल्या किरणांनी प्रेरित केलेल्या चेतनेने भरून टाकते आणि सात घोड्यांचा सूर्य रथ त्याच्या प्रेरणेने माझ्या बुद्धीला आणि सर्जनशीलतेला मजबूत करतो.' हे विश्वकवींचे शब्द माझ्या मनात भरून येतात!
मी वृद्ध झालो तरी माझ्या मनात नवनवीन कल्पनांचे नेहमीच धुमारे फुटतात, त्यातून एक गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे 'बदल शाश्वत आहे... बदल हाच सत्य आहे'. रामोजी ग्रुप परिवाराचा प्रमुख या नात्याने मी तुम्हा सर्वांना हे पत्र लिहिण्यास प्रवृत्त झालो, कधी आणि कुठे कळत नाही, मात्र या गोष्टीची जाणीव व्हावी हीच इच्छा आहे. एक प्रकारे ही भविष्यातील योजना आहे. रामोजी ग्रुप ऑफ कंपनीजचे कर्मचारी या नात्याने तुम्हा सर्वांना तुमच्या भव्य उद्दिष्टांसाठी शुभेच्छा!
व्यक्तीचं अनेकवचन म्हणजे शक्ती असं मी मानतो. जरी रामोजी ग्रुपच्या सर्व कंपन्या माझ्या कल्पनांच्या बुद्धीचा आविष्कार आहेत. मात्र त्या सर्व शक्तिशाली प्रणालींच्या माध्यमातून स्थापित झाल्या आहेत. त्या जगभरातील लाखो लोकांना आवडल्या आहेत. मला असे अनेक कर्मचारी माहीत आहेत, ज्यांनी या संस्थांच्या विकासात प्रत्यक्ष भूमिका बजावली आहे. त्या सर्वांनीच झटून काम केलं आहे. त्या सगळ्यांचं नावही आज घराघरात घेतलं जात आहे.
रामोजी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये काम करणे ही आदराची बाब आहे, कंपनीशी अविभाज्यपणे जोडलेले अद्वितीय वैशिष्ट्य असलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांचा मला अभिमान आहे. कठोर परिश्रमाने, काहीही अशक्य नाही - हे एक व्यावसायिक तत्त्व आहे जे मी अनेक दशकांपासून निष्ठेने आचरणात आणलं आहे! म्हणून, माझ्या सर्व संस्था थेट सार्वजनिक हिताशी जोडलेल्या आहेत. त्यातील कर्मचारी अशा पद्धतीने कार्यरत आहेत की ते कार्यतत्परतेचा मुकुटमणी ठरावेत. अनेक दशकांपासून माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या आणि माझी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात मला मदत करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार!
आपण हाती घेतलेलं कोणतंही काम किंवा हाती घेतलेला प्रकल्प हा एकमेवाद्वितीयच असला पाहिजे, ते दुसऱ्या क्रमांकाचेही कधीच असू नयेत, हा माझा आयुष्यभर आग्रह राहिला आहे. त्या आकांक्षेनं, मी अक्षरशः जीवनभर झिजून मार्गदर्शी ते ETV भारत पर्यंत सर्व काही सर्वोत्तम केलं, तेलुगु अस्मितेच्या अभ्युदयाचा झेंडा नेहमीच उंच फडकवत ठेवला.